मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs BAN 2nd ODI: भारताला जिंकावंच लागेल, हॉटस्टार, प्राईम नाही तर ‘या’ अ‍ॅपवर दिसणार सामना

IND vs BAN 2nd ODI: भारताला जिंकावंच लागेल, हॉटस्टार, प्राईम नाही तर ‘या’ अ‍ॅपवर दिसणार सामना

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 07, 2022 10:41 AM IST

ind vs ban 2nd odi match preveiw: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना उद्या खेळवला जाणार आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला उद्याचा सामना जिंकावाच लागणार आहे. जर उद्या टीम इंडियाचा पराभव झाला तर मालिका बांगलादेशच्या खिशात जाईल.

IND vs BAN 2nd ODI
IND vs BAN 2nd ODI

टीम इंडिया सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर संघ ३ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला अवघ्या एका विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता भारतीय संघाला मालिका वाचवायची असेल पुढचा सामना जिंकावाच लागणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना उद्या (७ डिसेंबर) बुधवारी ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर होणार आहे.हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ११.३० वाजता सुरू होईल.

पहिल्या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अत्यंत खराब होते. त्या सामन्यात वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

सामना कोणत्या चॅनलवर दिसणार?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सर्व सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या सोनी टेन चॅनलवर पाहू शकता. तर लाईव्ह स्ट्रिमिंग Sony Liv अॅपवर पाहता येईल.

दोन्ही संघ

भारत-

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, शाहबाज अहमद अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन.

बांगलादेश-

लिटन दास (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराज, अफिफ हुसैन ध्रुबो, इबादत हुसेन, अनामूल हक, लिटन दास, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन, हसन महमूद रहमान, मुस्तफिकर रहमान , नसूम अहमद आणि तस्किन अहमद.

WhatsApp channel

संबंधित बातम्या