मराठी बातम्या  /  धर्म  /  Vastu Tips : घरात लक्ष्मी मातेचा फोटो लावण्याची योग्य दिशा कोणती?

Vastu Tips : घरात लक्ष्मी मातेचा फोटो लावण्याची योग्य दिशा कोणती?

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jan 15, 2023 04:00 PM IST

Which direction Is Right To Keep Lakshmi Mata Photo : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे माता लक्ष्मीजींचे स्थान.

घरात देवी लक्ष्मीचा फोटो कुठे असावा
घरात देवी लक्ष्मीचा फोटो कुठे असावा (हिंदुस्तान टाइम्स)

हिंदू धर्मात माता लक्ष्मीला सुख, समृद्धी आणि संपत्तीची देवी मानले जाते. ज्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते, त्याच्या आयुष्यात धन आणि धान्याची कमतरता नसते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे माता लक्ष्मीजींचे स्थान. मातेचे मंदिर योग्य दिशेने असावे. वास्तुशास्त्रामध्ये देवी लक्ष्मीच्या स्थानाविषयी अनेक विशेष गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

लक्ष्मीच्या मूर्तीसाठी योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार मातालक्ष्मीचा फोटो दक्षिण दिशेला लावणे शुभ नाही, यामुळे घरातील सुख-समृद्धी दूर होते आणि गरिबी येते. याशिवाय देवी लक्ष्मीचा फोटो उभ्या स्थितीतही लावू नये कारण देवी लक्ष्मीचा स्वभाव चंचल आहे आणि ती एका जागी थांबत नाही, त्यामुळे लक्ष्मीच्या निवासासाठी तिचा फोटो बसलेल्या स्थितीत लावावा.

वास्तुशास्त्रानुसार मातालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नेहमी उत्तर दिशेला लावावा, यामुळे घरात सुख-समृद्धी, संपत्ती, धान्य आणि वैभव टिकून राहते. व्यवसायात नफा असेल तर जीवनात प्रगती होईल.

या गोष्टी कायम ठेवा लक्षात

वास्तुशास्त्रानुसार एका ठिकाणी लक्ष्मीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती बसवू नयेत, असे करणे अशुभ आहे. लक्ष्मी देवीच्या मूर्ती किंवा फोटोजवळ सुंदर रांगोळी काढा. माता लक्ष्मीची मूर्ती उजव्या बाजूला गणेशजींसोबत किंवा डाव्या बाजूला विष्णूजींसोबत ठेवावी. सकाळ संध्याकाळ खऱ्या भक्तीने मातालक्ष्मीची पूजा करा आणि तिला सुख, समृद्धी आणि सौभाग्याची कामना करा.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

WhatsApp channel

विभाग