मराठी बातम्या  /  धर्म  /  Garuda Purana : यशस्वी आयुष्याची गुरूकिल्ली आहे गरूड पुराणातल्या 'त्या' सात गोष्टी

Garuda Purana : यशस्वी आयुष्याची गुरूकिल्ली आहे गरूड पुराणातल्या 'त्या' सात गोष्टी

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 22, 2023 07:07 AM IST

Things To Remember From Garuda Purana : आज आपण गरूड पुराणातल्या त्या सात गोष्टी पाहाणार आहोत ज्यांचं पालन करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं. या सात गोष्टींचं पालन केल्यास व्यक्ती जीवनात सदैव यशस्वीच होतो

गरूड पुराण काय सांगतं
गरूड पुराण काय सांगतं (HT)

गरुड पुराणातून आपल्याला अनेक प्रकारची शिकवण मिळते. गरुड पुराणात मृत्यूपूर्वी आणि मृत्यू नंतरच्या स्थितीचे वर्णन केले आहे. गरुड पुराण हे हिंदू धर्मातील प्रसिद्ध धार्मिक ग्रंथांपैकी एक आहे. हे १८ पुराणांपैकी एक मानले जाते. आज आपण गरूड पुराणातल्या त्या सात गोष्टी पाहाणार आहोत ज्यांचं पालन करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं. या सात गोष्टींचं पालन केल्यास व्यक्ती जीवनात सदैव यशस्वीच होतो. कोणत्या आहेत त्या सात गोष्टी चला पाहूया.

गरूड पुराणात सांगितलेल्या त्या सात गोष्टी

संयम आणि दक्षता

जीवनातच आपण आपल्या चांगल्यावाईट कर्माने मित्र किंवा शत्रू बनवतो. ज्याला शत्रू नाही त्याने जीवनात काहीच केलेलं नाही असं लोकं म्हणतात. शत्रूंचा सामना करताना सतर्कता आणि हुशारीचा अवलंब करावा. शत्रू सतत आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत जर आपण हुशारी दाखवली नाही तर आपलेच नुकसान होईल. त्यामुळे जीवनात संयम आणि दक्षता अत्यंत महत्वाची भूमीका पार पाडतात.

स्वच्छ आणि सुगंधित कपडे

जर तुम्हाला श्रीमंत, श्रीमंत किंवा भाग्यवान व्हायचे असेल तर तुम्ही स्वच्छ, सुंदर आणि सुगंधी कपडे घालणे गरजेचे आहे. गरुड पुराणानुसार घाणेरडे कपडे घालणाऱ्यांचे सौभाग्य नष्ट होते.ज्या घरात घाणेरडे कपडे घालणारे लोक असतात तिथे लक्ष्मी कधीच येत नाही. त्यामुळे सौभाग्यही त्या घरातून निघून जाते आणि घरात गरीबी येते.

सरावाने करा ज्ञानाचे जतन

कितीही कठीण प्श्न असला तरीही तो ज्ञानाचा असावा, विज्ञानाचा असावा, त्यातून काहीतरी शिकता येण्यासारखं असावं. असे प्रश्न आपल्याला सराव करण्यास भाग पाडतात. ज्ञान अर्जित करण्यासाठी त्याचा सराव असणं अत्यंत महत्वाचं आहे. गरुड पुराणानुसार असे मानले जाते की आपण जे काही वाचतो, त्याचा एकदाच अभ्यास केला पाहिजे. जेणेकरून ते ज्ञान आपल्या मेंदूमध्ये घट्ट बसेल.

निरोगी शरीर

आहार ही उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली आहे असं गरूड पुराण सांगतं. आहार उत्तम आणि पोषक असल्यास व्यक्तीला उत्तम आरोग्य लाभतं. मात्र असंतुलित आहार आपल्या शरीराला आजारांकडे, व्याधींकडे घेऊन जातात. त्यामुळे आपण नेहमी संतुलित आहार घ्यावा असं गरूड पुराण सांगतं.

एकादशी-व्रत करावं

एकादशी व्रत हे भगवान विष्णूंचं अत्यंत प्रिय व्रत आहे. भगवान श्रीविष्णू गरूड पुराणात सांगतात की, हे व्रत केल्याने माणसाला मोक्ष मिळतो. ती व्यक्ती श्रीविष्णूंच्या अत्यंत प्रिय व्यक्तींपैकी एक मानली जाते. त्यामुळे ही व्यक्ती सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त होते.

तुळशीचं महत्त्व काय आहे ते समजून घ्या

आयुर्वेदात तुळशीला अत्यंतत उच्च स्थान देण्यात आलं आहे. तुळशीचे गुणधर्म व्यक्तीला असाध्य आजारातून मुक्त करण्याची क्षमता ठेवतात. गरूड पुराणात तुळशीचं महत्व माणसाने समजून घेतलं पाहीजे असं सांगण्यात आलं आहे. तुळशीचं रोज सेवन केल्याने व्यक्ती कमी आजारी पडते असं गरूड पुराण सांगतं.

मंदिर आणि धर्माचा आदर करा

जो कोणी देवी, देव किंवा धर्माचा अपमान करतो त्याला आयुष्यात एक दिवस पश्चात्ताप करावा लागतो आणि नरकात जावे लागते. गुरुड पुराणानुसार अशा लोकांबद्दल बरेच काही सांगितलं गेलं आहे. चांगल्या व्यक्ती, धर्म, धार्मिक क्षेत्र यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींना नरकाशिवाय अन्य कोणतीही जागा नाही असं गरूड पुराणात सांगण्यात आलं आहे.

 

 

WhatsApp channel

विभाग