मराठी बातम्या  /  religion  /  Ganesh Jayanti 2023 : १२ राशीच्या व्यक्तींनी विनायक चतुर्थीला म्हणावेत हे मंत्र, गजानन होतील प्रसन्न
गणपती बाप्पा
गणपती बाप्पा (हिंदुस्तान टाइम्स)

Ganesh Jayanti 2023 : १२ राशीच्या व्यक्तींनी विनायक चतुर्थीला म्हणावेत हे मंत्र, गजानन होतील प्रसन्न

24 January 2023, 15:32 ISTDilip Ramchandra Vaze

Vinayak Chaturthi 2023 : सर्व राशीसाठी वेगवेगळे मंत्र आहेत ज्याने गणराय प्रसन्न होतील. हे मंत्र खूप प्रभावी मानले जातात.

विघ्नहर्त्या श्री गजाननाचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला. यंदा गणेश जयंती २५ जानेवारी २०२३ बुधवारी आहे. विनायक चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पाला प्रसन्न करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील संकटे दूर करू शकता. या दिवशी पूजेच्या वेळी गणेशाच्या प्रभावी मंत्रांचा जप करावा. सर्व राशीसाठी वेगवेगळे मंत्र आहेत ज्याने गणराय प्रसन्न होतील. हे मंत्र खूप प्रभावी मानले जातात. तुमच्या राशीनुसार त्या त्या मंत्राचा जाप केल्यास तुम्हाला भगवान गणपतीबाप्पाची कृपा प्राप्त होऊ शकते. तुमच्या जीवनात प्रगती होईल आणि समृद्धी येईल.

ट्रेंडिंग न्यूज

गणेश जयंतीच्या दिवशी त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची पूजा करा, ज्यामध्ये त्याची सोंड डावीकडे वळलेली आहे. हा गणपती लवकरच प्रसन्न होईल. गणेशाच्या मंत्रांचा जप करण्यासाठी रुद्राक्ष किंवा लाल चंदनाचा मणी वापरावा. चला जाणून घेऊ राशीनुसार गणेशाचे प्रभावी मंत्र.

राशीनुसार गणेश मंत्र

मेष: ओम वक्रतुण्डाय हूं

वृष: ओम हीं ग्रीं हीं

मिथुन: ओम गं गणपतये नमः

कर्क: ओम वक्रतुण्डाय हूं

सिंह: ओम सुमंगलाये नम:

कन्या: ओम चिंतामण्ये नम:

तुला: ओम वक्रतुण्डाय नम:

वृश्चिक: ओम नमो भगवते गजाननाय

धनु: ओम गं गणपते मंत्र

मकर: ओम गं नम:

कुंभ: ओम गण मुक्तये फट्

मीन: ओम गं गणपतये नमः

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग