मराठी बातम्या  /  धर्म  /  Vidhi Upay : वैवाहिक जीवनात समस्या असतील तर करा हे उपाय

Vidhi Upay : वैवाहिक जीवनात समस्या असतील तर करा हे उपाय

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 09, 2023 03:31 PM IST

How To Take Blessings Of Shiva & Parvati For Married Life : नवरा बायकोत सतत वाद होत असतील, एकमेकांशी सतत बिनसत असेल किंवा योग्य वय होऊनही योग्य वर मिळत नसेल तर अशा वेळेस स्त्रियांनी काही गोष्टी कराव्यात असं गरुड पुराणात सांगितलं गेलं आहे.

भगवान शिव आणि पार्वती
भगवान शिव आणि पार्वती (Freepik)

सृष्टीचे त्राता भगवान शिव आणि माता पार्वती आजही एक आदर्श पती-पत्नी म्हणून ओळखले जातात. माता पार्वतीने भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांना आपला पती बनवण्यासाठी कठोर तप केल्याचं आपल्याला माहिती असेल. मग तुमच्याही वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील, नवरा बायकोत सतत वाद होत असतील, एकमेकांशी सतत बिनसत असेल किंवा योग्य वय होऊनही योग्य वर मिळत नसेल तर अशा वेळेस स्त्रियांनी काही गोष्टी कराव्यात असं गरुड पुराणात सांगितलं गेलं आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी हे आपण पाहाणार आहोत.

नवऱ्याचं प्रेम प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं

शिवलिंगावर जल अर्पण करावं आणि माता पार्वतीची विधीवत पूजा करावी. कुंडलीत विवाह दोष असल्यास दर गुरुवारी व्रत करावं. शिवलिंगाला डाळ आणि बेसनाचे लाडू अर्पण करावेत. वैवाहिक जीवनात सुख शांती टिकून राहावी असं वाटत असेल तर स्त्रीने दोन तोंडं असणारा किंवा गौरी शंकराचा रुद्राक्ष धारण करावा.

इच्छित वर मिळवण्यासाठी काय करावं

आजही जर मुलीने भगवान शिव आणि माता पार्वतीची खऱ्या मनाने पूजा केली तर देवाच्या कृपेने तिला इच्छित वर मिळू शकतो. यासोबतच त्याच्या कृपेने वैवाहिक जीवनातील समस्याही दूर होऊ शकतात. भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हे उपाय केले जाऊ शकतात. जर एखाद्या मुलीच्या लग्नाला विनाकारण उशीर होत असेल किंवा तिला योग्य वर मिळत नसेल तर तिने नियमितपणे भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग