मराठी बातम्या  /  धर्म  /  Sant Kabirdas Jayanti 2023 : समाजातल्या कुप्रथांवर भाष्य करणाऱ्या संत कबीरांची आज जयंती

Sant Kabirdas Jayanti 2023 : समाजातल्या कुप्रथांवर भाष्य करणाऱ्या संत कबीरांची आज जयंती

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jun 04, 2023 01:07 AM IST

Sant Kabirdas : संत कबीर केवळ संतच नव्हते तर ते विचारवंत आणि समाजसुधारकही होते. समाजातील दुष्कृत्ये दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अनेक दोहे आणि कविता रचल्या.

संत कबीरदास
संत कबीरदास (HT)

भारताचे महान संत कबीर यांची आज जयंती आहे. कबीरांचा जन्म ब्राम्हण विधवा स्त्री च्या पोटी झाला. नंतर त्या स्त्रीने या बाळाला उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथल्या लहरतारा तलावाच्या काठावर सोडलं. तिथनं निरू आणि निमा हे मुस्लिम दांपत्य जात होतं आणि त्यांना हे बाळ दिसलं. यांना मूलबाळ नसल्याने त्यांनी या बाळाची काळजी घेतली आणि त्याचा सांभाळ केला अशी आख्यायिका आहे.

रामानंद स्वामी यांना कबीरांचा गुरू मानलं जातं. रामानंद स्वामी यांच्यामुळेच कबीरांना रामाची ओळख झाली. संत कबीर केवळ संतच नव्हते तर ते विचारवंत आणि समाजसुधारकही होते. समाजातील दुष्कृत्ये दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अनेक दोहे आणि कविता रचल्या. कबीरदास हे हिंदी साहित्यातील असे कवी होते, ज्यांनी आपल्या लेखनातून समाजात पसरलेल्या ढोंगीपणावर प्रहार केला. संत कबीरदासांनी आयुष्यभर समाजात पसरलेल्या कुप्रथा आणि अंधश्रद्धा यांचा निषेध केला.

संत कबीर यांच्या जन्माचा तसा कोणताही दाखला पाहायला मिळत नाही. आज आपण कबीर जयंतीच्या निमित्ताने संत कबीर यांच्या काही दोह्यांना पाहाणार आहोत.

 

१) गुरु गुरु मे भेद है, गुरु गुरु मे भाव

सोई गुरु नीत बंदिये , शब्द बतावे दाव

खरा गुरू तोच जो शब्दांपलिकडचं पाहायला, अनुभवायला शिकवतो.

२)गुरु बिन ज्ञान न उपजै, गुरु बिन मिले न मोष

गुरु बिन लखै न सत्य को, गुरु बिन मीटै न दोष

मोक्षरूपी मार्ग दाखवणारे गुरू आहेत.

३) गुरु सो ज्ञान जु लिजिए , सीस दिजिये दान

बहुतक भोंदू बही गये, राखी जीव अभिमान

आपले तनमन संपूर्ण श्रद्धेने गुरूंना समर्पित करा.

४) गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान

गुरु बिन सब निष्फल गया, पूछो वेद पुरान

गुरूंच्या ज्ञानाशिवाय जप करणे, पूजापाठ करणे आणि दान देणे हे सर्व व्यर्थ आहे

५) जिन गुरु जैसा जानिया , तिनको तैसा लाभ

ओसे प्यास न भागसी , जब लगी धसै न आस

ज्याला जसा गुरू मिळाला, जितकी गुरुची ओळख पटली, त्याला तितकाच ज्ञानरूपी लाभ होतो.

 

 

WhatsApp channel

विभाग