Kalastami May 2023 : कधी आहे कालाष्टमी?, कालभैरवाची पूजा करण्याचे मुहूर्त कोणते?
Kalashtami Pooja & Shubh Muhurta : शनी आणि राहूच्या दशेपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव यांची पूजा केली जाते. या महिन्यातली कालाष्टमी १२ मे २०२३ रोजी म्हणजेच शुक्रवारी साजरी केली जाणार आहे.
दर महिन्यातनं एकदा कालाष्टमीचं व्रत साजरं केलं जातं. महादेवाचे एक रौद्र रूप म्हणजेच कालभैरव मानले जातात. मान्यतेनुसार शनी आणि राहूच्या दशेपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव यांची पूजा केली जाते. या महिन्यातली कालाष्टमी १२ मे २०२३ रोजी म्हणजेच शुक्रवारी साजरी केली जाणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
कालभैरवाच्या पूजेचा शुभ काळ कोणता?
हिंदू कॅलेंडरनुसार, कालाष्टमी तिथीची सुरुवात १२ मे २०२३ रोजी सकाळी ०९ वाजून ०६ मिनिटांनी होत आहे. कालाष्टमी दुसऱ्या दिवशी म्हणजेच १३ मे २०२३ रोजी सकाळी ०६ वाजून ५० मिनिटांनी संपेल. प्रचलित मान्यतेनुसार रात्री काल भैरवाची पूजा करणे शुभ मानले जाते. त्यानुसार १२ मे रोजी कालाष्टमी साजरी केली जाणार असल्याने १२ मे रोजी संध्याकाळी कालभैरवाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे.
कालभैरवाची पूजा संध्याकाळीच का करतात?
भैरवाने प्रदोष काळात अवतार घेतला होता. प्रदोष काळ म्हणजे दिवस आणि रात्र यांच्या संगमाचा काळ. त्यामुळे भैरवाची पूजा संध्याकाळी आणि रात्री करणे सर्वात शुभ मानलं गेलं आहे.
कशी कराल कालभैरवाची पूजा?
संध्याकाळी स्नान करून शेंदूर, सुगंधित तेलाने भैरवाचा शृंगार करा. लाल चंदन, अक्षता, गुलाबाचे फुल, जानवे, नारळ अर्पण करा. तिळगुळ किंवा गुळ-शेंगदाण्याचा नैवेद्य भैरवाला दाखवावा.
त्यानंतर भैरवाला सुगंधित धूप किंवा अगरबत्ती आणि तेलाचा दिवा लावावा.
दिवा लावल्यावर या मंत्राचा (भैरव मंत्राचा) जप करावा.
धर्मध्वजं शङ्कररूपमेकं शरण्यमित्थं भुवनेषु सिद्धम्।
द्विजेन्द्र पूज्यं विमलं त्रिनेत्रं श्री भैरवं तं शरणं प्रपद्ये।।
विभाग