Chaitra Navratri 2023 : कात्यायनी देवीच्या पूजनाचे मुहूर्त कोणते?
Chaitra Navratri Day Six : कात्यायनी देवीच्या स्वरूपाविषयी बोलायचे झाले तर माता राणीचे रूप अतिशय भव्य आणि तेजस्वी आहे. आईला चार हात असून आईचे वाहन सिंह आहे.
माता कात्यायनीचे मंत्र
ट्रेंडिंग न्यूज
बीज मंत्र:
क्लीं श्री त्रिनेत्राय नम:
उपासना मंत्र:
माते देवी कात्यायन्यै नमः
स्तुती मंत्र:
या देवी सर्वभूतेषु माता कात्यायनी रुपेण संस्थाता. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. आज आपण दुर्गा मातेच्या सहाव्या रुपाचं अर्थात माता कात्यायनीचं दर्शन घेणार आहोत आणि त्यांची पूजा करणार आहोत. नवरात्रीत नवदुर्गांना अत्यंत मानाचं स्थान आहे. चैत्र नवरात्र असो किंवा शारदीय नवरात्र. दोन्ही नवरात्र भारतातल्या घरोघरी अत्यंत भक्तीभावाने आणि श्रद्धेने पाळल्या जातात.
कसं बनलं माता कात्यायनीचं रूप
कात्यायन ऋषींनी घोर तपस्या केली. त्यांच्या तपस्येनं माता दुर्गा प्रसन्न झाली. दुर्गा मातेनं त्यांना साक्षात्कार दिला आणि त्यांची इच्छा विचारली. तेव्हा अत्यंत विनम्रतापूर्वक कात्यायन ऋषींनी दुर्गा मातेला आपण माझ्या मुलीच्या रुपात जन्म घ्यावा अशी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन दुर्गा देवीने ऋषी कात्यायन यांच्या मुलीच्या रुपात जन्म घेतला आणि कात्यायन ऋषींची मुलगी म्हणून दुर्गामाता कात्यायनी म्हणून ओळखली जाऊ लागली.
आज कात्यायनी देवीच्या पुजनाचे शुभ मुहूर्त कोणते
पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी सोमवार, २७ मार्च रोजी संध्याकाळी ५.२७ वाजता सुरू होत आहे.तर आयुष्मान योग पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत म्हणजेच साधारणपणे ११.१५ पर्यंत आहे, आयुष्मान योगानंतर सौभाग्य योग सुरू होईल. आज दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग आहे. रवि योग सकाळी ०६.१५ ते दुपारी ०३.२९ पर्यंत आहे.
माता कात्यायनी पूजा विधि
- सकाळी लवकर उठणे, आंघोळ वगैरे आटोपून स्वच्छ कपडे घालणे.
- मातेच्या मूर्तीला शुद्ध पाण्याने किंवा गंगाजलाने स्नान घालावे.
- आईला पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करावेत.
- आंघोळीनंतर आईला फुले अर्पण करा.
- आईला कुंकू लावावे.
- आईला पाच प्रकारची फळे आणि मिठाई अर्पण करा.
- माता कात्यायनीला मध अर्पण करा.
- माता कात्यायनीचे अधिकाधिक ध्यान करा.
- आईची आरतीही करावी.
माता कात्यायनी पूजेचे महत्त्व
- धार्मिक मान्यतांनुसार माता कात्यायनीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.
- माता कात्यायनीची उपासना केल्याने कुंडलीत बृहस्पति बलवान होतो.
- माता कात्यायनीला मध अर्पण केल्याने सुंदर रूप येते.
- माता कात्यायनीची पूजा-अर्चा केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते.
- शत्रूंचे भय संपते.
- माता कात्यायनीच्या कृपेने आरोग्याशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)