वैशाखातलं प्रदोष व्रत येत्या १७ मे २०२३ रोजी म्हणजे बुधवारी पाळलं जाणार आहे. हे व्रत बुधवारी येत असल्याने याला बुध प्रदोष व्रत असंही म्हणतात. भगवान शिवशंकरासाठी हे व्रत ठेवलं जातं. मुख्यत्वे ज्यांना संतानप्राप्ती हवी असेल त्यांनी हे व्रत ठेवल्यास त्याचे शुभ फल मिळतात असं सांगितलं जातं. मात्र प्रदोष कालाचं हे व्रत संध्याकाळी ठेवलं जातं.
बुध प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा मुहूर्त संध्याकाळी 07 वाजून 05 मिनीटं के रात्री 09 वाजून 10 मिनिटांपर्यंत असेल. यासोबतच या खास दिवशी आयुष्मान योगही तयार होत आहे, जो रात्री ०९.१९ मिनिटांपर्यंत राहील. असे मानले जाते की आयुष्मान योगामध्ये आध्यात्मिक कार्य केल्याने व्रत करणाऱ्याला विशेष लाभ होतो.
बुधवारी प्रदोष तिथी असल्यामुळे याला बुध प्रदोष व्रत म्हणून ओळखलं जातं.
एखाद्या मंदिरात किंवा आपल्या घराच्या देवघरात भगवान शंकराचा अभिषेक करा.
प्रदोष व्रतामध्ये संध्याकाळच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. प्रदोष व्रतात संध्याकाळी केलेली शिवपूजा खूप फलदायी असते. म्हणूनच संध्याकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर पुन्हा स्वच्छ कपडे घाला. यानंतर गंगेच्या पाण्याने पूजास्थानाची शुद्धी करा.
पूजा सुरू करण्यापूर्वी गणेशाची आराधना करावी. आता गाईचे दूध, तूप, गंगाजल, दही, मध, साखर यांनी महादेवाचा अभिषेक करून महामृत्यूजय मंत्राचा जप करावा.
शिवमंत्रांचा उच्चार करताना जानवं, भस्म, अक्षता, कलव, बेलपत्र, पांढरे चंदन, अंजिराची फुले, सुपारीची पाने, सुपारी अर्पण करा. शेवटी शिव चालिसाचे पठण करावे.
१. ॐ नमः शिवाय ।
२. ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि! तन्नो रुद्रः प्रचोदयात् ।।
३. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय ।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नम: शिवाय ।।
४. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ।।
५. ब्रह्ममुरारिसुरार्चितलिंगम् निर्मलभासितशोभितलिंगम् ।
जन्मजदु:खविनाशकलिंगम् तत्प्रणमामि सदाशिवलिंगम् ।।
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)