छोट्या पडद्यावरील 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेत राकेश बापट महत्त्वाच्या भूमिकेत असून त्याची एजे ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत एजे आणि लीलाचा साखरपुडा होणार आहे. त्यांच्या साखरपुड्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्या साखरपुड्याचे काही खास क्षण शूट करण्यात आले आहेत.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये लीलालाने लाल रंगाची साडी नेसली आहे. तर एजेने राखाडी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.