अभिनेत्री मृणाल ठाकूर ही तिच्या साधेपणासाठी विशेष ओळखली जाते. तिचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसतो. पण नुकताच नेसलेल्या एका साडीने मृणालने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मृणालने तिच्यासोशल मीडिया अकाऊंटवर जॉर्जेटची साडी नेसून केलेल्या फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत. या सिंपल दिसणाऱ्या साडीची किंमत असेल? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मृणाल ठाकूरच्या या जॉर्जेटच्या सिंपल आणि आकर्षक साडीची किंमत २ लाख रुपये आहे.
मोकळे केस, मोठे कानातले, न्यूड मेकअपमध्ये मृणाल अतिशय सुंदर दिसत आहे. तसेच तिने हातात अंगठी घातली आहे. तिने साडीवर हातात छोटी पर्स घेतली आहे.