Longest Sixes IPL 2024 : दिनेशा कार्तिक की क्लासेन? यंदा सर्वात लांब षटकार कोणी मारला? पाहा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Longest Sixes IPL 2024 : दिनेशा कार्तिक की क्लासेन? यंदा सर्वात लांब षटकार कोणी मारला? पाहा

Longest Sixes IPL 2024 : दिनेशा कार्तिक की क्लासेन? यंदा सर्वात लांब षटकार कोणी मारला? पाहा

Longest Sixes IPL 2024 : दिनेशा कार्तिक की क्लासेन? यंदा सर्वात लांब षटकार कोणी मारला? पाहा

Apr 22, 2024 04:49 PM IST
  • twitter
  • twitter
  • Longest Sixes IPL 2024 : आयपीएल २०२४ मध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पडत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? की या हंगामात सर्वाधिक लांब षटकार कोणत्या फलंदाजाने मारला आहे, नसेल तर जाणून घ्या यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार ठोकणारे टॉप ५ फलंदाज कोण आहेत?
आयपीएल २०२४ मध्ये धावांचा पाऊस पडत आहे. यंदाच्या प्रचंड प्रमाणात आयपीएलमध्ये चौकार-षटकार ठोकले जात आहेत. आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत १०८, १०६आणि १०३ मीटर लांबीचे षटकार पहिल्या पाचमध्ये मारले गेले आहेत.
twitterfacebook
share
(1 / 6)

दिनेश कार्तिक - आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणाऱ्यांच्या यादीत दिनेश कार्तिक पहिल्या क्रमांकावर आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर SRH विरुद्ध खेळल्या गेलेल्या IPL 2024 च्या ३० व्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला. या सामन्यात दिनेशने १०८ मीटर लांब षटकार ठोकला होता. हा एक हाय स्कोअरिंग सामना होता, ज्यामध्ये कार्तिकने ३५ चेंडूत ८३ धावा केल्या. यामध्ये ७ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता.
twitterfacebook
share
(2 / 6)

हेनरिक क्लासेन - यंदा सर्वाधिक लांब षटकार मारणाऱ्यांच्या यादीत हेनरिक क्लासेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB विरुद्ध खेळल्या गेलेल्या IPL 2024 च्या ३० व्या सामन्यात त्याने १०६ मीटर लांब षटकार मारला. या सामन्यात क्लासेनने ३१ चेंडूत ६७ धावा केल्या. यामध्ये ७ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता.
twitterfacebook
share
(3 / 6)

निकोलस पुरन - सर्वात लांब षटकार मारणाऱ्यांच्या यादीत निकोलस पूरन तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०२४ च्या १५व्या सामन्यात त्याने आरसीबीविरुद्ध ही कामगिरी केली. पुरनने १०६ मीटर लांब षटकार मारला होता. या सामन्यात निकोलस पुरनने २१ चेंडूत ५ षटकार आणि १ चौकारासह ४० धावा केल्या.
twitterfacebook
share
(4 / 6)

व्यंकटेश अय्यर- व्यंकटेश अय्यर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. आयपीएल २०२४ च्या १० व्या सामन्यात त्याने RCB विरुद्ध १०६ मीटर लांब षटकार ठोकला होता. हा सामनाही चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला होता. या सामन्यात व्यंकटेशने ३० चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांसह ५० धावा केल्या होत्या.
twitterfacebook
share
(5 / 6)

ईशान किशन - सर्वाधिक लांब षटकार मारणाऱ्या या यादीत इशान किशन पाचव्या स्थानावर आहे. इशानने हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एसआरएचविरुद्ध १०३ मीटर लांब षटकार ठोकला होता. या सामन्यात इशान किशनने १३ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारांसह ३४ धावा केल्या होत्या.
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज