हिंदू धर्मात हनुमानाची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी हनुमान जयंती मंगळवारी आहे. ज्यामुळे हा सण अधिकच खास झाला आहे. अशावेळी या दिवशी भगवान श्री हनुमानाला काही खास गोष्टी अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो.
चैत्र महिन्याची पौर्णिमा २३ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी सुरू होणार आहे. ही तिथी २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी संपणार आहे. अशा परिस्थितीत मंगळवार, २३ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
असे मानले जाते की श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी श्री हनुमानाला तूप, शेंदूर आणि हरभरा अर्पण केल्याने सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतात. यासोबतच महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी अश्वत्थ वृक्षाच्या पानांवर रामाचे नाव लिहून श्री हनुमानाला अर्पण करू शकता.
हनुमानाची पूजा करताना त्यांना लाडू, पंचमेवा, इमरती किंवा जलेबी आणि बुंदी अर्पण करू शकता. या गोष्टी श्री हनुमानाला अत्यंत प्रिय आहेत. हनुमानाला गूळ, हरभरा आणि सुपारी अर्पण करू शकता.
हनुमानाला लाल रंग आवडतो, त्यामुळे पूजेदरम्यान हनुमानाला लाल रंगाची फुले ही अर्पण करता येतात. तुम्ही झेंडूची फुले किंवा त्यापासून बनवलेल्या माळा देखील श्री हनुमानाला अर्पण करू शकता. तसेच श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी गुलाबाची फुले किंवा लाल रंगाची फुले अर्पण करून बजरंगबलीचा आशीर्वाद मिळवू शकता.