तुम्हाला माहिती आहे का थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे अनेक फायदे होतात. ब्लड सर्क्यूलेशन सुरळीत होते. त्यासोबतच अंगदुखी देखील कमी होते. अनेकदा नैराश्यामध्ये असलेल्या लोकांना डॉक्टर थंड पाण्याने अंघोळ करण्याचा सल्ला देतात. चला जाणून घेऊया थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे..
थंड पाण्याने अंघोळ केल्याने नर्वस सिस्टम उत्तेजित होते. ज्यामुळे लक्ष केंद्रीत करण्यास मदत होते.
नैराश्यामध्ये असलेल्या व्यक्तींना अनेकदा डॉक्टर थंड पाण्याने अंघोळ करण्याचा सल्ला देतात. यामुळे नैराश्य कमी होते.