छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते.' या मालिकेत सतत काही ना काही घडत असते. आता आरोही आणि यशचा विवाहसोहळा पार पडला आहे.
(Star Pravah instagram)आरोही आणि यशच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु होती. आता अखेर त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे.
आरोहीने लाल आणि जांभाळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. हातात हिरवा चुडा, पायात पैजण, केसाचा आंबाडा, गळ्यात ज्वेलरी अशा नव वधूच्या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
तर दुसरीकडे यशने जांभळ्या रंगाचे धोतर, त्यावर फिकट रंगाचा कुर्ता घातला आहे. तो देखील अतिशय हँडसम दिसत आहे.