मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vi Share Price: व्होडा-आयडियावर नवे संकट; गुंतवणूकदार धास्तावले!

Vi Share Price: व्होडा-आयडियावर नवे संकट; गुंतवणूकदार धास्तावले!

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Sep 29, 2022 08:03 PM IST

VI Share Price: कर्जाच्या बोझ्याखाली असलेल्या व्होडाफोन आयडिया कंपनीसमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. या कारणामुळे गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावल्याने त्यात तब्बल ७ टक्के घट झाली.

Vodafone idea in trouble. Indus towers asks clear dues for business continuity post nov. stock crash
Vodafone idea in trouble. Indus towers asks clear dues for business continuity post nov. stock crash

कर्जाच्या आर्थिक संकटात असलेल्या व्होडाफोन-आयडिया कंपनीसमोर नवे संकट उभे राहिले आहे. कंपनीला मोबाईल टॉवर देणारी कंपनी इंडस टॉवरने व्होडा-आयडियाला थकीत रक्कम भरण्यास सांगितले आहे. थकीत रक्कम न भरल्यास सेवा बंद करण्यात येईल अशी इशारा देण्यात आला आहे. या कारणामुळे व्होडा-आयडियाच्या ग्राहकांच्या सेवेवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. 

कंपनीत उद्भवलेल्या या संकटामुळे गुंतवणूकदारांमध्येही भीतीचे वातावरण आहे. याच कारणामुळे गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावला आहे. गुरुवारी कंपनीच्या समभाग ७ टक्क्यांनी गडगडले. दिवसअखेर ८.४० रुपयांवर ते स्थिरावले. कंपनीचे बाजारभांडवल मूल्य २७ हजार कोटी रुपये इतके आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, इंडस टॉवरने नोव्हेंबरनंतर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी नोव्हेंबरपर्यंत थकीत रक्कम भरण्याच्या सूचना व्होडा-आयडियाला देण्यात आल्या आहेत. कंपनी ही रक्कम भरण्यास असमर्थ ठरल्यास इंडस टाँवर व्होडाफोन – आयडियाची सेवा पूर्णपणे बंद करेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन कॉर्पोरेशन (एटीसी) देखील आपले थकीत कर्ज फेडण्याची तयारी करत आहे. कंपनीचे भारतात ७५,००० मोबाईल टॉवर्स आहेत. वोडा-आयडियाचे इंडस टावर्सकडे अंदाजे ६,८०० कोटी रुपये आणि एटीसीचे अंदाजे २,४०० कोटी रुपये थकीत असल्याचा अंदाज आहे. 

WhatsApp channel

संबंधित बातम्या