मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  IT Raids : कर बुडव्या राजकीय पक्षांवर I-T चे छापे; गुजरात, महाराष्ट्रात १२३ कार्यालयांची झाडाझडती

IT Raids : कर बुडव्या राजकीय पक्षांवर I-T चे छापे; गुजरात, महाराष्ट्रात १२३ कार्यालयांची झाडाझडती

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 08, 2022 12:31 PM IST

I-T raids on political funding: ईडी नंतर आता आयटी विभागाने विविध राजकीय पक्षांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमधील तब्बल १२३ पक्षांवर कर चुकवल्या प्रकरणी आयटी विभागाने धाडी टाकल्या आहेत.

IT Raid on Political Party
IT Raid on Political Party

मुंबई: ईडी नंतर आता आयटीचे अधिकारी सक्रिय झाले आहेत. देशातील अनेक नोंदणीकृत पण सक्रिय नसलेले पक्ष आयटीच्या रडारवर आहेत. कोट्यवधी रुपयांचा कर बुडवल्या प्रकरणी आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील तब्बल १२३ नोंदणीकृत पक्षांच्या कार्यालयावर धाडी टाकल्या. आयटी विभागाचे तब्बल २५० अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. देशाच्या इतर राज्यातही ही कारवाई सुरू आहे.

मुंबईतील सायन येथील कोळीवाडा येथील एका झोपडपट्टीतून तसेच बोरिवली येथील एका छोट्या फ्लॅटमधून पक्षाचे काम चालवत असलेल्या पक्षाच्या कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. या दोन्ही पक्षांनी गेल्या दोन वर्षात हवाला रॅकेटच्या माध्यमातून १५० कोटी रुपयांच्या देनग्या गोळा होत्या. आणि रोख रक्कम जमा करत टॅक्स बुडवला होता. या दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी मिळालेल्या रकमेपैकी राबबल ०.०१ टक्के रक्कम कमिशन म्हणून लाटल्याची माहिती मिळत आहे. हे पक्ष राजकीय दृष्ट्या सक्रिय नाहीत. हे पक्ष कर चुकवण्या साठीच स्थापन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पक्षाच्या अध्यक्षांनी गुजरात-आधारित हवाला ऑपरेटरच्या सूचनेनुसार पक्ष स्थापन केले. या व्यक्तीच्या आधारे पक्षाचे सर्व आर्थिक व्यवहार हाताळले जात होते. हवाला ऑपरेटर्सना मदत दिल्याबद्दल त्यांना कमिशन म्हणून नाममात्र रक्कम मिळाल्याचे या पक्षांच्या अध्यक्षांनी आयटी विभागाला दिलेल्या माहितीत सांगितले.

सरकारी नोंदीनुसार देशात सुमारे २ हजार ४४ नोंदणिकृत पक्ष आहेत. हे पक्ष राजकीय दृष्ट्या सक्रिय नसल्याने त्यांची नावे देखील सामान्य नागरिकांना माहिती नाहीत. हे पक्ष पैशांचा गैरव्यवहार करत असल्याची माहिती आयटी विभागाला होती. आयकरच्या कलम ८० GGC नुसार लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 29A अंतर्गत, नोंदणीकृत असेलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाला एखादी व्यक्ती कितीही रक्कम दान करू शकते. त्यानंतर देणगी दिलेली व्यक्ति दिलेल्या रकमेच्या १०० टक्के पर्यन्त कर सवलत घेऊ शकते. बहुतेक नोंदणीकृत आणि मान्यता नसलेले पक्ष या सवलतीचा फायदा हा कर चुकवण्यासाठी करत आहेत. यातूनच बेहिशेबी पैसा जमवला जात आहे.

हवाला ऑपरेटर राजकीय पक्ष तयार करण्यासाठी आणि प्राधिकरणाकडे नोंदणी करण्यासाठी आधी संपर्क साधतात. हवाला ऑपरेटर पक्षांचे सर्व आर्थिक आणि बँक खाते नियंत्रणस्वतकडे ठेवतात. देणगीचा धनादेश आणि ऑनलाइन व्यवहार यातून या छोट्या पक्षांना पैसे पाठवले जातात. नंतर विविध माध्यमातून हे पैसे पुन्हा हवाला ऑपरेटर स्वत:कडे वळवून घेतो. रोख रक्कम काढण्याआधी बनावट कंपन्यांच्या मदतीने पैसे परत स्वत:कडे ठेवतात. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर बुडवला जातो.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग