मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sonam Wangchuk : ऑल इज नॉट वेल! ‘३ इडियट्स’ची प्रेरणा असलेले सोनम वांगचुक यांचे आजपासून उपोषण

Sonam Wangchuk : ऑल इज नॉट वेल! ‘३ इडियट्स’ची प्रेरणा असलेले सोनम वांगचुक यांचे आजपासून उपोषण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 26, 2023 06:09 PM IST

SonamWangchukappealstopmNarendramodi : लडाखमधील दोन तृतीयाश हिमनद्या लुप्त झाल्या असून हे असेच चालू राहिल्यास देशातील पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. याकडे लक्ष वेधण्यासाठी सोनम वांगचुक आजपासून पाच दिवस उपोषण करणार आहेत.

सोनम वांगचुक
सोनम वांगचुक

लेह - सामाजिक कार्यकर्ते, इंजिनिअर आणि इनोव्हेटर सोनम वांगचुक हे लडाख वाचवण्यासाठी आजपासून पाच दिवस उपोषण करणार आहेत. लडाखमधील समाज सुधारक सोनम वांगचुक आता देशातील ओळखीचे व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या आयुष्यातून प्रेरित होऊन बॉलीवुड फिल्म ३ इडियट बनवली गेली. त्यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले होते की, लडाखचे संरक्षण करावे. कारण विविध अभ्यासांनी हे समोर आले आहे की, लडाखमधील दोन तृतीयांश बर्फ विलुप्त झाला आहे. सोनम वांगचुक यांनी म्हटले की, जर असाच बेजबाबदारपणा राहिला तर हिमनद्या लुप्त होतील. त्यामुळे भारत व शेजारी देशांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते.

मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून एक व्हिडीओ मेसेज पोस्ट केला होता की लडाखमधील परिस्थिती चांगली नाही. कारण इथल्या सुमारे दोन तृतीयांश हिमनद्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत नाजूक इकोसिस्टमचे रक्षण करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती वांगचुक यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.

मोदींना उद्देशून तयार केलेल्या या व्हिडीओमध्ये सोनम वांगचुक यांनी असंही म्हटलं आहे की, "२६ जानेवारीपासून पाच दिवसांचं लाक्षणिक उपोषण करणार आहेत, पंतप्रधान मोदींना ते म्हणाले की, खारदुंगला येथे उणे ४० अंश तापमानात उपवास केल्यानंतर मी वाचलो तर मी तुम्हाला पुन्हा भेटेन. 'सिंगल यूज प्लास्टिक'वर बंदी आणल्याबद्दल वांगचुक यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केलं आहे.

 

IPL_Entry_Point