मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Amrit Udyan : राष्ट्रपती भवनमधील मुगल गार्डनचे बदलले नाव, आता असेल 'अमृत उद्यान'

Amrit Udyan : राष्ट्रपती भवनमधील मुगल गार्डनचे बदलले नाव, आता असेल 'अमृत उद्यान'

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 28, 2023 06:22 PM IST

Mughal garden Now known as amrit udyan : राष्ट्रपती भवनातील मुगल गार्डनचे नाव बदलून आता अमृत उद्यान ठेवण्यात आले आहे.

Amrit Udyan
Amrit Udyan

राष्ट्रपती भवनमधील मुगल गार्डनचे नाव बदलण्यात आले आहे. आता याला 'अमृत उद्यान' नावाने ओळखले जाईल. राष्ट्रपती भवनमधील मुगल गार्डन आपल्या सुंदरतेमुळे खूप प्रसिद्ध आहे. मुगल गार्डन पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी लाखो पर्यटक येथे येत असतात. येथे १३८ प्रकारचे गुलाब, १० हजाराहून अधिक ट्यूलिप बल्ब आणि ७० वेगवेगळ्या प्रजातींची जवळपास ५ हजार फुले आहेत. हे गार्डन देशाचे पहले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सामान्य लोकांसाठी खुले केले होते. तेव्हापासून प्रत्येक वसंत ऋतूत हे गार्डन लोकांसाठी खुले केले जाते.

राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) मधील मनमोहक मुगल गार्डन (Mughal Garden) चे नाव बदलले आहे. आता हे अमृत गार्डन (Amrit Udyan) नावाने ओळखले जाईल. राष्ट्रपती प्रेस सचिव अजय सिंह यांनी म्हटले की, देशाच्या स्वांत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रपती भवनातील सर्व उद्यानांना 'अमृत उद्यान' संबोधले जाईल. सिंह यांनी सांगितले की, राष्ट्रपतींनी निर्णय घेतला आहे की, मुगल गार्डनची नवी ओळख अमृत उद्यान म्हणून असेल. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही 'अमृत उद्यान' ३१ जानेवारीपासून सामान्य लोकांसाठी खुले आहे. २६ मार्चपर्यंत हे गार्डन खुले राहील. 

१५ एकर जमिनीवर पसरलेले मुगल गार्डनचे निर्माण ब्रिटिश सरकारच्या काळात केले होते. मुगल गार्डनला राष्ट्रपती भवनचा आत्मा संबोधले जाते. मुगल गार्डनचा एक भाग विशेष प्रकारच्या गुलाबाच्या फुलांसाठी ओळखला जातो. इंग्रज वास्तुकार सर एडवर्ड लुटियन्स यांनी राष्ट्रपती भवन आणि मुगल गार्डनचे डिझाइन केले होते. 

राष्ट्रपतींच्या उप माध्यम सचिव नविका गुप्ता यांनी सांगितले की, मुगल गार्डनमध्ये येणाऱ्या लोकांच्या सुविधेसाठी सर्व रोपांजवळ क्यूआर कोड लावला जाईल. त्याचबरोबर आणखी एक बदल केला आहे. येथे प्रतिदिन जवळपास २० कर्मचारी गाईडचे काम करतील. ते येथे येणाऱ्या लोकांना फुलांसंबधित माहिती देतील.

 

IPL_Entry_Point