मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Road Accident : चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक इनोव्हावर आदळली; भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू!

Road Accident : चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक इनोव्हावर आदळली; भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 16, 2022 12:18 PM IST

Road Accident In Gurugram : अपघात इतका भीषण होता की, की जेव्हा भरधाव वेगानं येणारी ट्रक इनोव्हावर आदळली तेव्हा कारबमध्ये बसलेले सर्व प्रवाशी जमिनित गाडले गेले.

Road Accident In Gurugram
Road Accident In Gurugram (HT_PRINT)

Road Accident In Gurugram : देशाची क्राईम कॅपिटल अशी ओळख असलेल्या आणि दिल्लीचा उपनगरीय भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुग्राममध्ये एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव येणाऱ्या ट्रकनं इनोव्हाला धडक दिल्यानं कारमध्ये बसलेल्या एका मुलीसह चार लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक कारवर आदळल्यानंतर कारमधील सर्व प्रवाशी जमिनीत गाडले गेले. हा अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीनं एकत्र येत प्रवाशांना कारमधून बाहेर काढलं, तोपर्यंत चार लोकांचा जागीच मृत्यू झालेला होता, तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले होते, त्यामुळं आता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीलगत असलेल्या हरियाणातील गुरुग्राममध्ये राजस्थानच्या उदयपूरातून परतणाऱ्या प्रवाशांच्या कारवर राष्ट्रीय महामार्ग ४८ वर भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकनं धडक दिली. त्यानंतर ट्रक थेट कारवरच पलटी झाली, त्यामुळं कारमध्ये बसलेल्या प्रवाशांचा चुराडा झाला, त्यामुळं हा अपघात पाहिल्यानंतर स्थानिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. गुरुग्राम पोलिसांना या अपघाताची माहिती कळताच त्यांनी अपघातस्थळी धाव घेत चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. याशिवाय ज्या लोकांना मृत्यू झाला आहे, त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं आणि ब्रेक न लागल्यानं ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे.

दिल्लीलगत असलेल्या गुरुग्राम आणि गाझीयाबाद या दोन शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हत्या, दरोडा, चोरी आणि बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता गुरुग्राममध्ये झालेल्या या भीषण अपघातामुळं सर्वांनाच धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई-पुणे महामार्गावर शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन झालं होतं. त्यानंतर आता देशातील महामार्गावरील नियमावली आणि सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग