मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जगातील सर्वात घाणेरड्या व्यक्तीचे निधन, ५० वर्षापासून केली नव्हती अंघोळ; आता विक्रम 'या' भारतीयाकडे

जगातील सर्वात घाणेरड्या व्यक्तीचे निधन, ५० वर्षापासून केली नव्हती अंघोळ; आता विक्रम 'या' भारतीयाकडे

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 25, 2022 10:53 PM IST

जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती असण्याचे अनौपचारिक रेकॉर्ड आपल्या नावावर करणाऱ्या इराणी व्यक्तीचे निधन झाले आहे. ईराणी मीडिया रिपोर्टनुसार ९४ वर्षीय व्यक्तीचे मंगळवारी निधन झाले.

जगातील सर्वात घाणेरड्या व्यक्तीचे निधन
जगातील सर्वात घाणेरड्या व्यक्तीचे निधन

जगातील सर्वात घाणेरडा व्यक्ती (Dirtiest man) असण्याचे अनौपचारिक रेकॉर्ड आपल्या नावावर करणाऱ्या इराणी व्यक्तीचे निधन झाले आहे. ईराणी मीडिया रिपोर्टनुसार ९४ वर्षीय व्यक्तीचे मंगळवारी निधन झाले. या व्यक्तीने मागील ५० वर्षापासून अंघोळ केली नव्हती. त्यामुळे त्याला जगातील सर्वात अस्वच्छ व्यक्ती म्हटले जात होते. या व्यक्तीचे नाव अमौ हाजी (Amou Haji) असे होते. 

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अमौ हाजी याला भीती वाटत होती की, जर त्याने अंघोळ केली तर त्याला इंफेक्शन होईल, यामुळे त्याने अंघोळ करणेच सोडून दिले. अमौ हाजी दक्षिणी फार्स प्रांतातील देजगाह गावात एकटाच रहात होता. IRNA च्या रिपोर्टनुसार हाजीचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे. वर्ष २०१३ मध्ये या व्यक्तीवर 'द स्ट्रेंज लाइफ ऑफ अमौ हाजी' नावाची एक शॉर्ट डॉक्यूमेंट्री बनवण्यात आली होती. डॉक्यूमेंट्रीमध्ये दाखवले गेले होते की, अमौ हाजी कशा प्रकारे जीवन जगतात. 

IRNA एजन्सीने एका स्थानिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, हाजी यांनी आजारी पडण्याच्या भीतीने अंघोळ करणे सोडून दिले होते. मात्र काही महिन्याआधी पहिल्यांदाच स्थानिक लोक त्याला अंघोळ घालण्यासाठी बाथरूममध्ये घेऊन गेले होते. लोकांनी सांगितले की, हाजी तरुण असताना काही धक्क्यातून सावरले नाहीत. त्यामुळे त्यांनी अंघोळ करणे सोडून दिले. २०१४ मध्ये तेहरान टाइम्सने सांगितले की, हाजी रस्त्यावर मरून पडणारी जनावरे खात होते. जानवरांच्या मलाने भरलेल्या पाइपने धूम्रपान करत होते. त्यांचे मानणे होते की, स्वच्छता त्यांना आजारी पाडेल. 

हाजी यांच्या मृत्यूनंतर हा विक्रम एका भारतीय व्यक्तीच्या नावावर नोंद होऊ शकतो. ज्यांनी आपल्या आयुष्यात मागील अनेक वर्षापासून अंघोळ केलेली नाही. २००९ मध्ये  हिंदुस्तान टाइम्सने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले होते की, वाराणसीच्या जवळ कैलाश गावातील कलाऊ सिंह यांनी देशासमोरील सर्व समस्या संपवण्यासाठी मागील ३० वर्षाहून अधिक काळापासून अंगोळ केलेली नव्हती, कलाऊ सिंह प्रत्येक संध्याकाळी धूम्रपान करतो तसेच कलाऊ एका पायावर उभे राहून भगवान शिव यांची पूजाही करत होते. 

IPL_Entry_Point