मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारींवर सायबर विमा आहे उत्तम उपाय

वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारींवर सायबर विमा आहे उत्तम उपाय

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
May 30, 2022 03:42 PM IST

वेगवेगळ्या मार्गाने सायबर चोरीचं प्रमाण सध्या वाढलंय. अशात सायबर विमा काढणं हा सध्या एक सर्वोत्तम उपाय मानला जातोय.

सायबर विमा
सायबर विमा (हिंदुस्तान टाइम्स)

सायबर आणि डिजिटल टेक्नॉलॉजीचा उपयोग जसाजसा वाढतोय तशीच सायबर गुन्हेगारीही वाढतेय.करोनाच्या काळात डिजिटल पेमेंटवर लोकांनी अधिक भर दिला. मात्र याच काळात सायबर फसवणुकींमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली.तुमचा डेटा,ओळख इत्यादींची चोरी हे सायबर चोर करु लागले. यापासून वाचण्यासाठी आता सायबर विमा खरेदी करणं एक चांगला निर्णय ठरु शकतो.

काय आहे सायबर विमा?

सायबर विमा तुमच्या झालेल्या नुकसानाला भरुन काढतो थर्ड पार्टीमुळे झालेलं तुमचं नुकसानही यात भरुन मिळतं. याशिवाय कोणत्याही सायबर फसवणुकीनंतर नैराश्य आल्यास वैद्यकिय तापसण्याही यात कव्हर होतात.

कव्हर होणाऱ्या प्रमुख गोष्टी

  • ईमेल स्पूफिंग, फिशिंगमुळे झालेलं नुकसान
  • बँक अकाऊंट, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा ई-वॉलेटद्वारे ऑनलाइन ट्रांजेक्शनमध्ये झालेली फसवणूक
  • आपल्या गोपनियतेवर झालेल्या हल्ल्यामुळे प्रतिष्ठेचं झालेलं नुकसान
  • डेटा किंवा संगणकाला पोहोचलेलं नुकसान, त्याचं रिस्टोअरेशन आणि इस्टॉलेशन खर्च
  • थर्ड पार्टीच्या दाव्यामुळे कोर्टात हजेरी लावताना झालेला परिवहन खर्च
  • सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी
  • वैयक्तिक डिव्हाइसमध्ये अॅपमध्ये संवेदनशिल डेटा स्टोअर करताना तुमच्याकडे एखादं चांगलं सिक्युरिटी टूल असणं गरजेचं आहे ज्यानं मालवेअर किंवा रेंसमवेअर किंवा सायबर क्राइमबाबत माहिती मिळू शकेल.घराच्या नेटवर्कमध्ये साधरणपणे फायरवॉलचा वापर केला जातो.लोकांसाठी मोफत वायफाय सेवेत आपल्या फोनला जोडणंही कधी जोखमीचं ठरु शकतं.
  • सायबर अपराधी नेहमी इमेलद्वारे फिशींग करतात.यूजरला असे मेल खरे वाटतात मात्र ते फसवे असतात.अशा वेळेस अनोळखी मेल न उघडणे किंवा एखादी अनोळखी पॉप अप विंडो न उघडणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. अशा वेबसाईटच्या पुढे https:// लावलं गेलं आहे की नाही याची खात्री करुन घेणे.
  • प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पासवर्ड मजबूत ठेवणे.पासवर्डमध्ये अल्फा न्युमरिकसोबतच स्पेशल कॅरेक्टर्स वापरात आणावेत.वेगवेगळ्या अकाऊंटवर एकच पासवर्ड ठेवू नये. कारण एका अकाऊंटवरील पासवर्ड माहिती झाल्यावर त्याचा परिणाम तुमच्या इतर अकाऊंटवरही होऊ शकतो.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या