मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pharma Company : केंद्र सरकारकडून १८ फार्मा कंपन्यांवर कारवाईचा बडगा; लायसन्स रद्द, उत्पादन थांबवले

Pharma Company : केंद्र सरकारकडून १८ फार्मा कंपन्यांवर कारवाईचा बडगा; लायसन्स रद्द, उत्पादन थांबवले

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 29, 2023 12:34 AM IST

pharma companies licenseCancel :केंद्र सरकारने १८ फार्मा कंपन्यांचे लायसन्स रद्द केले आहे. त्यांच्यावर बनावट आणि निकृष्ट औषधांच्या निर्मितीचा ठपका ठेवण्यात आला आहे. अनेक देशांतून भारतीय औषधांमुळे होणारे मृत्यू आणि आजारांच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

Pharma Company License : गेल्या वर्षी उजबेकिस्तानमध्ये भारतीय कंपनीचे कफ सिरप प्यायल्याने १८ मुलांचा मृत्यू झाल्यानंतर भारत सरकारकडून औषध उत्पादन व निर्मिती कंपन्यांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. बनावट आणि निकृष्ट औषधे बनवणाऱ्या फार्मा कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. केंद्र सरकारने मंगळवारी (२८ मार्च) केलेल्या कारवाईत १८ फार्मा कंपन्यांचे लायसन्स रद्द केले आहे. त्यांच्यावर बनावट आणि निकृष्ट औषधांच्या निर्मितीचा ठपका ठेवण्यात आला आहे. संबंधित कंपन्यांना उत्पादन थांबवण्यास सांगण्यात आले आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून अनेक औषध कंपन्यांची तपासणी केली जात आहे.

केंद्र सरकार आणि राज्याच्या आरोग्य पथकांनी २० राज्यांतील औषध उत्पादन कंपन्यांची तपासणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गेल्या १५ दिवसांपासून ही मोहीम सुरू होती.

पथकाने हिमाचल प्रदेशातील ७०, उत्तराखंडमधील ४५ आणि मध्य प्रदेशातील २३ कंपन्यांवर कारवाई केली. अनेक देशांतून भारतीय औषधांमुळे होणारे मृत्यू आणि आजारांच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले.

 

गेल्या महिन्यात गुजरातमधील फार्मा कंपनी Zydus Lifesciences ने अमेरिकेतून जेनेरिक औषधाच्या ५५ हजाराहून अधिक बाटल्या परत मागवल्या होत्या. औषध तपासणीत हे औषध फेल ठरले होते.

IPL_Entry_Point

विभाग