मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  amazon layoffs: ‘या’ कंपन्यांना झालंय काय? ट्वीटर, फेसबुक नंतर आता ॲमेझॉन हजारो कर्मचाऱ्यांना काढणार

amazon layoffs: ‘या’ कंपन्यांना झालंय काय? ट्वीटर, फेसबुक नंतर आता ॲमेझॉन हजारो कर्मचाऱ्यांना काढणार

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Nov 12, 2022 10:45 AM IST

Amazon Layoff: गेल्याच आठवड्यात नवी नोकरभरती थांबवण्याचे आदेश कंपनीने दिले होते. त्यानंतर आता नोकर कपात केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Twitter, Meta नंतर आता Amazon करणार नोकर कपात; ३७०० कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात
Twitter, Meta नंतर आता Amazon करणार नोकर कपात; ३७०० कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात (AFP)

Amazon Layoff: ट्विटरने ५० टक्के कर्मचारी कपात केल्यानंतर मेटानेही हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिला. यानंतर आता ई कॉमर्स कंपनी अमेझॉनसुद्धा कर्मचारी कपातीच्या तयारीला लागली आहे. यामुळे कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी आता धोक्यात आली आहे. अमेझॉन कंपनीने नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. तसंच सध्या नव्या भरतीवरही बंदी घातली आहे. आर्थिक परिस्थितीचे कारण देत नवी भरती थांबवण्यात आली आहे. तसंच जवळपास ३७०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आर्थिक मंदीमुळे अमेझॉन कंपनीने नुकसान होत असलेल्या प्रक्रिया बंद करण्यास सुरुवात केलीय. गेल्याच आठवड्यात नवी नोकरभरती थांबवण्याचे आदेश कंपनीने दिले होते. त्यानंतर आता नोकर कपात केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याआधी मायक्रोसॉफ्ट, ट्विटरने नोकर कपात केली. त्यानंतर मेटाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. कंपन्यांनी नोकर कपातीचा निर्णय आर्थिक नुकसान होत असल्यानं घेतल्याचं सांगितलं. मेटाने ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं तर ट्विटरने ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली. आता यापाठोपाठ ई कॉमर्स कंपनी अमेझॉनसुद्धा नोकरकपातीच्या तयारीत आहे.

अमेझॉनमध्ये रोबोटिक्स विभागात कर्मचाऱ्यांची कपात केली जाण्याची शक्यताा आहे. अमेझॉनमधील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने त्याला काढून टाकण्यात आल्याचं लिंक्डइनवर म्हटलं आहे. तसंच एका माजी कर्मचाऱ्याने रोबोटिक्स विभागाला कंपनीकडून नोटीस दिली गेल्याचं म्हटलं आहे. अमेझॉनमध्ये रोबोटिक्स विभागात ३७०० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या