मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Prithvi Shaw: पृथ्वी शॉ पुरता अडकला.. महिलेने केला मारहाणीचा आरोप, तरुणीबरोबर झटापटीचा VIDEO व्हायरल

Prithvi Shaw: पृथ्वी शॉ पुरता अडकला.. महिलेने केला मारहाणीचा आरोप, तरुणीबरोबर झटापटीचा VIDEO व्हायरल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 16, 2023 08:04 PM IST

Prithvi Shaw attacked : पृथ्वी शॉ याच्या कारवर हल्ला झाल्यानंतर या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं असून पृथ्वी शॉ याने मारहाण केल्याचा आरोप तरुणीने केला असून याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तरुणीबरोबर झटापटीचा VIDEO व्हायरल
तरुणीबरोबर झटापटीचा VIDEO व्हायरल

Prithvi Shaw : भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ बाबत एकगंभीर प्रकरण समोर आले आहे. एक महिला समर्थकानेपृथ्वी शॉवर मारहाण केल्याचा आरोप लावला आहे. ही घटना मुंबईतील विलेपार्लेमधील एका फाइव्ह स्टारहॉटेलच्या समोर बुधवारी रात्रीच्या वेळी घडली. दरम्यान पृथ्वी शॉयाने ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्याच्यावर व त्याच्या मित्रावर काही लोकांनी बेसबॉलच्या स्टिकने हल्ला केला. त्याच्या गाडीचे नुकसान केले. मात्र एका व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ हातात स्टिक घेतल्याचे दिसत आहे तसेच त्याची एक तरुणीसोबत झटापटही होत आहे.

पृथ्वीशॉ याचा मित्र आशीष सुरेंद्र यादव याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या गाडीवर बेसबॉलच्या काठ्यांनी हल्ला केला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या कारचा पाठलाग केला. पैसे न दिल्यास खोटी केस दाखल करण्याची धमकी दिली. सुरेंद्र यांने ८ लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

सपनाने पृथ्वी शॉ वर लावला मारहाणीचा आरोप -

या ८ लोकांमध्येसना उर्फ सपना गिलआणिशोभित ठाकुरया दोघांची ओळख पटली आहे. आता या प्रकरणात सपनाचे वकील अली काशिफ खान यांनी पृथ्वी शॉ वर सपनाला मारहाण केल्याचा आरोप लावला आहे.

त्यांनी म्हटले की, पृथ्वीने सपनाच्या शरीराशी झटापट करत तिला मारहाण केली. त्याच्या हातात बेसबॉलची स्टिकही दिसत आहे. पृथ्वी शॉ च्या मित्राने आधी हल्ला केला होता. सपनाने ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिला मेडिकल करण्याची परवानगी दिली नाही. पृथ्वी शॉचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याच्या हातात काठी दिसत आहे. सपना गिल पृथ्वी शॉच्या हातातील काठी पकडताना दिसत आहे.

सेल्फी घेण्याच्या कारणाने झाला वाद -

पृथ्वी शॉ बुधवारी रात्री अपल्या मित्रांबरोबर एका पंचतारांकित हॉटेलात डिनर करण्यासाठी गेला होता. त्यावेळी हे संपूर्ण कांड घडले. तक्रारीनुसार दोन अज्ञात आरोपी पृथ्वी शॉच्या जवळ आले व सेल्फी घेण्याची मागणी करू लागला. शॉ ने दोन लोकांना सेल्फी दिली मात्र पुन्हा त्यांचा संपूर्ण ग्रुप सेल्फी घेण्यासाठी आला त्यावेळी नकार दिल्यानंतर हे प्रकरण घडले.

पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र जेवण करून बाहेर आल्यानंतर गाडीतून काही अंतर पुढे गेले असता. आरोपींनी कारला घेराव घातला. टोळक्याने पृथ्वी शॉच्या मित्राच्या वाहनावर हल्ला करत काच फोडून मारामारी करू लागला. एवढेच नाही तर त्याने पृथ्वीच्या मित्राकडे५०हजार रुपयांची मागणी केल्याचे सांगण्यात आले आहे. यादरम्यान पृथ्वी शॉला दुसऱ्या वाहनातून पाठवण्यात आले.

WhatsApp channel

विभाग