मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nanded Murder : नांदेड हादरले ! लग्नाच्या वरातीत गेल्यामुळे दलित तरुणाची हत्या; वंचितची कारवाईची मागणी

Nanded Murder : नांदेड हादरले ! लग्नाच्या वरातीत गेल्यामुळे दलित तरुणाची हत्या; वंचितची कारवाईची मागणी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 04, 2023 07:40 AM IST

Nanded Murder : नांदेड येथे लग्नाच्या वारातीत नाचल्याने दोन गटात हाणामारी झाली. यात एका तलीत युवकाची हत्या करण्यात आली. या घटनेचा वंचित बहुजन आघाडीने निषेध करत या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

Nanded Murder
Nanded Murder

नांदेड : लग्नाच्या वरातीत काही युवक गेल्यामुळे नांदेड जवळील बोंडार गावात तूफान हाणामारी झाली. या मारहाणीत एका दलित युवकाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना १ जून रोजी घडली. अक्षय भालेराव असं हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, ही हत्या महाराष्ट्राच्या पुरोगामी मुखवट्यावर काळीमा फासणारी असल्याची टीका करत मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

नांदेड मधील बोंढार हवेली गावात लग्नाच्या वरातीत गेल्यामुळे वाद झाला होता. दलित तरुणाने आंबेडकर जयंती साजरी करण्यात पुढाकार घेतल्यामुळे सवर्ण तरुणांनी त्याची हत्या केली, असा आरोप माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केला आहे. गुन्हेगारांना अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपीना अटक केलीय, गावात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बोंडार गावात झालेल्या हाणामारीनंतर गावात तणावपूर्ण वातावरण आहे. गावात झालेल्या दगडफेकीत काही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे, त्याचा पंचनामा सुरू आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केलं आहे. या प्रकरणी काही जण सोशल मीडियावर अफवा पसरवत असल्याने हे प्रकरण चिघळण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग