मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ambani School : मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी

Ambani School : मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 12, 2023 12:18 PM IST

Bomb Threat Call: धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल बॉम्बनं उडवण्याच्या धमकीच्या कॉलनंतर आजुबाजूच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झालंय.

bomb threat call
bomb threat call

Bomb threat to Dhirubhai Ambani International School: मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बनं उडण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर बीकेसी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीनं मंगळवारी दुपारी ४.३० च्या सुमारास शाळेच्या लॅंडलाईनवर कॉल करून ही धमकी दिली. त्यानंतर ही माहिती तात्काळ मुंबई पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील धीरूभाई अंबानी शाळेत काल संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फोन आला. समोरच्या व्यक्तीनं ही शाळा बॉम्बनं उडवून देण्याची धमकी दिली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात आयपीसीच्या कलम 505 (1) (ब) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. महत्वाचे म्हणजे, फोन करणाऱ्या ओळख पटली असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला धमकीचा कॉल आला होता. त्यावेळी संबंधित व्यक्तीनं फोनद्वारे हॉस्पिटलला बॉम्बनं उडवून देण्याची आणि अंबानी कुंटुबाला ठार मारण्याचीही धमकी दिली होती.

IPL_Entry_Point

विभाग