मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Metro Timings: मुंबईकर प्रवाशांना खूशखबर! मेट्रो आता एक तास लवकर सुटणार

Mumbai Metro Timings: मुंबईकर प्रवाशांना खूशखबर! मेट्रो आता एक तास लवकर सुटणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Nov 29, 2022 11:14 AM IST

Mumbai Metro Timings: घाटकोपर-वर्सोवा मार्गावरील मेट्रो सेवेच्या वेळेत एक तासानं वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

Mumbai Metro
Mumbai Metro

Mumbai Metro Timings: मुंबईतील घाटकोपर-वर्सोवा मेट्रो मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. या मार्गावरील मेट्रो सेवेची वेळ एक तासानं वाढवण्यात आली आहे. म्हणजेच, पहिली गाडी आता एक तास लवकर सुटणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार, आता पहिली मेट्रो गाडी सकाळी ५.३० मिनिटांनी सुटणार आहे.

मेट्रोची पहिली गाडी लवकर सोडण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. त्याची दखल घेऊन 'मेट्रो वन'नं हा निर्णय घेतला आहे. काल, २८ नोव्हेंबर पासून नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार, पहिली ट्रेन वर्सोवा आणि घाटकोपर स्थानकातून एकाच वेळी सकाळी साडेपाच वाटता सुटणार आहे. तर, शेवटची ट्रेन वर्सोवा स्थानकातून रात्री ११.२० वाजता तर घाटकोपर स्थानकातून ११.४५ वाजता सुटणार आहे. मुंबई मेट्रो वन कंपनीनं ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारी ही मेट्रो मुंबईकरांसाठी नवी लाइफलाइन ठरली आहे. या मार्गावरून दररोज सुमारे ४ लाख लोक प्रवास करतात. घाटकोपर-वर्सोवा मेट्रो मार्गावर साकीनाका, मरोळ सारखे औद्योगिक परिसर आहेत. त्याच बरोबर या मार्गावर मोठ्या प्रमाणावर कंपन्यांची कार्यालयं आहेत. त्यामुळं येथील मेट्रो ट्रेन कोणत्याही वेळेस तुडुंब भरून धावत असतात. सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन कामाच्या वेळेत दर ३.५ मिनिटांनी तर अन्य वेळेस साधारण ८ मिनिटांनी मेट्रोची फेरी चालवण्यात येते. वीकेण्डला आणि सार्वजनिक सुट्ट्याच्या दिवशी प्रवाशांच्या गर्दीनुसार गाड्यांच्या फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल केला जातो.

IPL_Entry_Point

विभाग