मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Marathi News 04 August 2022 Live: Home Minister Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल

Union home minister Amit Shah Amit Shah Mumbai Visit Today

Marathi News 04 August 2022 Live: Home Minister Amit shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल

01:36 AM ISTSep 05, 2022 07:06 AM Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • Share on Facebook

Marathi News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत दाखल झाले आहे. विमानतळावर दाखल झाले आहे. त्यांचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत गेले. ते सह्याद्री आथितिगृहावर विश्रांतीसाठी आज जाणार आहे.

Sun, 04 Sep 202204:37 PM IST

Home Minister Amit shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत दाखल झाले आहे. विमानतळावर दाखल झाले आहे. त्यांचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत गेले. ते सह्याद्री आथितिगृहावर विश्रांतीसाठी आज जाणार आहे. दरम्यान ते उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या घरी जाणार आहे. तसेच काही गणेश मंडळांना देखील अमित शहा भेट देणार आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बांदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Sun, 04 Sep 202202:13 PM IST

CM Eknath Shinde : शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार शिक्षकांशी संवाद; समाजमाध्यमांवरून होणार थेट प्रसारण

मुंबई:  शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (दि. ५ सप्टेंबर) राज्यातील शिक्षकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री  शिंदे वर्षा शासकीय निवासस्थानातून दुपारी १ वाजेपासून दृकश्राव्य प्रणालीद्वारे राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. कोरोना संकटानंतर अलिकडेच शैक्षणिक वर्षाला नियमितपणे सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध मुद्दे आणि नवी दिशा यांचा या संवादादरम्यान उहापोह होणे अपेक्षित आहे. या संवादाचे मुख्यमंत्री सचिवालयाच्या समाज माध्यमांवरून थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

Sun, 04 Sep 202202:07 PM IST

Cyrus Mistry : सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाबद्दल टाटा समूहाने व्यक्त केले दुख:

प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे कार अपघातात निधन झाल्यामुळे टाटा समूहाने दुख: व्यक्त केले आहे. टाटा सन्स अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी बाबत निवेदन दिले आहे. सायरस मिस्त्री यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे आम्हाला खूप दुख: झाले आहे. ते एक उत्साही उद्योजक होते.

Sun, 04 Sep 202201:36 PM IST

PM Narendra Modi : सायरस मिस्त्री यांच्या निधनाने देशाचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

सायरस मिस्त्री या तरुण उद्योजनाकाचे निधन झाल्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी उद्योग विश्वात अनेक नवे प्रयोग राबविले होते. तरुण उद्योजकांसाठी ते आदर्श होते, असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Sun, 04 Sep 202210:53 AM IST

टाटा समूहाचे माजी प्रमुख साइरस मिस्त्री यांचे पालघर येथे अपघाती मृत्यू

टाटा समूहाचे माजी प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योजक साइरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले. ते अहमदाबाद येथून कारने मुंबईत येत होते, ते पालघर येथे आले असता, चारोटी येथे त्यांची गाडी सूर्या नदीवरील सुरक्षा भिंतीला धडकली. यात त्यांच्या मृत्यू झाला.

Sun, 04 Sep 202207:35 AM IST

Raj Thackeray : राज ठाकरेंनी घेतलं चिंचपोकळीच्या राजाचं दर्शन

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परळमधील चिंचपोकळीच्या (लालबाग) राजाचं दर्शन घेतलं आहे. सकाळी मुंबईत पाऊस सुरू असल्यानं ते दर्शनासाठी येणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता त्यांनी दुपारी चिंचपोकळीच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.

Sun, 04 Sep 202205:58 AM IST

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद आजपासून जम्मू-काश्मीर दैऱ्यावर, मोठी घोषणा करण्याच्या तयारीत?

Ghulam Nabi Azad JK Visit : गेल्या अनेक दशकांपासून कॉंग्रेससोबत असलेल्या गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर आता ते आजपासून जम्मू-काश्मिरच्या दौऱ्यावर असून ते जाहीर सभा घेणार आहेत. याशिवाय ते कोणत्या पक्षात जाणार किंवा स्वत:चा पक्ष स्थापन करणार का?, याची घोषणादेखील ते काश्मिरमधील या दौऱ्यातून करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Sun, 04 Sep 202205:57 AM IST

Dasra Mekava : दसरा मेळाव्याचा वाद पेटला; ठाकरे-शिंदे कोर्टात येणार आमने-सामने

Dasra Mekava In Dadar Mumbai : शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून पेटलेला वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे. कारण आता शिवसेनेला मुंबई महापालिकेनं दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी कोर्टात जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळं शिवसेना कोर्टात गेल्यास शिंदेगटाकडूनही कोर्टात जाण्याची तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे.

Sun, 04 Sep 202205:57 AM IST

Kasba Peth Ganapati : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकरांनी घेतलं कसबा गणपतीचं दर्शन

Milind Narvekar and Neelam Gorhe In Pune : शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील मानाच्या कसबा पेठ गणपतीचं दर्शन घेतलं आहे.

Sun, 04 Sep 202203:23 AM IST

Mumbai Local Megablock : मुंबईत आज 'या' मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक

Mumbai Local Megablock : गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईत लोकल रेल्वेमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. परंतु आता वीकेंडच्याच दिवशी रेल्वेनं सांताक्रूझ ते गोरेगाव या पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे. आज सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Sun, 04 Sep 202201:41 AM IST

Congress Rally : वाढत्या महागाईविरोधात आज कॉंग्रेसचं रामलीला मैदानावर आंदोलन

Congress Protest Against Inflation : देशातील वाढत्या महागाईच्या विरोधात मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर कॉंग्रेसतर्फे आंदोलन केलं जाणार आहे. महागाईसह जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून कॉंग्रेसनं भाजपला घेरण्याची तयारी सुरू केली आहे.

Sun, 04 Sep 202201:40 AM IST

CJI Uday Lalit : माझी क्षमता, ज्ञान आणि विश्वासाला अनुसरूनच काम करणार - CJI उदय लळीत

CJI Uday Lalit In Nagpur : तुम्ही तुमच्या आयुष्यात काय केलंय हे महत्त्वाचं नाही, ते तुम्ही कशा प्रकारे केलंय ते महत्त्वाचं आहे. मे आता सरन्यायाधीश म्हणून जे काही करणार आहे, ते माझी क्षमता, ज्ञान आणि विश्वासाला अनुसरूनच करणार असल्याचं वक्तव्य देशाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी केलं आहे. नागपूरात हायकोर्टातील बार असोसिएशननं लळीत यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

Sun, 04 Sep 202201:40 AM IST

HM Amit Shah : काँग्रेसचा देशातून आणि कम्युनिस्ट पार्टीचा जगातून अस्त होणार- अमित शहा

HM Amit Shah On Congress And Communist Party : कॉंग्रेस पक्ष देशातून संपत असून कम्युनिस्ट पार्टी जगातून अंत होत असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. याशिवाय केरळमध्ये आगामी काळात भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावाही शहा यांनी केला आहे. शहा हे काल केरळ दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी दक्षिण क्षेत्रीय परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं.

Sun, 04 Sep 202201:40 AM IST

Five JDU MLAs join BJP : बिहारमध्ये सत्ता गेल्याचा बदला भाजपनं मणिपूरमध्ये घेतला- नितीश कुमार

Five JDU MLAs join BJP In Manipur : जेडीयूचे मणिपूरमधील पाच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये सत्ता गेल्याचा बदला भाजपनं मणिपूरमध्ये घेतला असून राजकीय परंपरेचा ते नवा मार्ग सुरू करत आहेत, असं म्हणत नितीश यांनी भाजपवर टीका केली आहे.

Sun, 04 Sep 202201:17 AM IST

India vs Pakistan : आशिया कपमध्ये आज भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने; महामुकाबल्यात कोण मारणार बाजी?

India vs Pakistan In Asia Cup 2022 : यूएईत सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये आज पुन्हा एकदा महामुकाबला होणार आहे. आशिया कपमधील सुपर ४ च्या फेरीतील हा सामना होणार असल्यानं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. २८ ऑगस्टला झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. परंतु आज पुन्हा दोन्ही संघात महामुकाबला होणार असल्यानं क्रिकेटप्रेमींचं या सामन्याकडे लक्ष असणार आहे.

Sun, 04 Sep 202201:16 AM IST

Aarey Metro Car Shed : आरे कारशेडविरोधात पर्यावरणवादी करणार आंदोलन

Aarey Metro Car Shed News : आरेतील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींचा लढा सुरुच आहे. कारण आता आज सकाळी ११ वाजता आरेतील पिकनिक स्पॉटवर मेट्रो कारशेडचा विरोध करण्यासाठी पर्यावरणप्रेमी आंदोलन करणार असल्याची माहिती आहे.

Sun, 04 Sep 202201:13 AM IST

Amit Shah Mumbai Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर

Amit Shah Mumbai Visit Today : केद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा आज मुंबईत येणार आहेत. या दौऱ्यात ते लालबागच्या राजाचं आणि सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेणार आहे. याशिवाय आगामी मुंबई महापालिकांची रणनिती आखण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेणार आहेत.