मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Satish Khare: जिल्हा उपनिबंधक सतीश खरे निलंबित; ३० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Satish Khare: जिल्हा उपनिबंधक सतीश खरे निलंबित; ३० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 19, 2023 01:23 PM IST

Satish Khare Bribe Case: जिल्हा उपनिबंधक सतीन खरे यांना अखेर निलंबित करण्यात आले.

Nashik
Nashik

Satish Khare Bribe Case: नाशिक जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्यासह वकिलाला लाच घेताना रंगहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी ही कारवाई केली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकाविरोधात दाखल तक्रारीवर सुनावणी घेऊन तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी सतीश खेर यांनी ३० लाखांची लाच मागितली. याप्रकरणी सतीश खरे यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. आज खरेंच्या इतर बँक खात्यांसह लॉकर्सची झाडाझडती घेण्यात येणार आहे.

नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. जिल्ह्यातील एका बाजार समितीमध्ये तक्रारदार हे संचालकपदी निवडूक आले. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणात निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी सतीश खरे यांनी आणि त्यांचा वकील सभद्रा यांनी ३० लाखांची लाच मागितली. खरेंनी संचालक यांना रक्कम घेऊन सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील त्यांच्या राहत्या घरी बोलावले. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून तीस लाखांची लाच घेताना खरे यांना रंगेहात पकडले. त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.

सतीश खरे १९ मे २०२३ पर्यंत एसीबीच्या कोठडीत आहे. खरेसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे विविध बँकेत १३ खाती आहेत. त्यापैकी काल ८ खाती तपासणी केली असता त्यात ४३ लाख ७६ हजार रुपये आढळून आले. आज त्यांच्या इतर बँक खात्यांसह लॉकर्सची झाडाझडती घेण्यात येणार आहे.

सहकार विभागात काही महिन्यांपूर्वी लाचलुचपत विभागाने कर्मचाऱ्यांना अटक केल्यानंतर या विभागातील आर्थिक लुटीचे प्रकार थांबतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र उलट त्याच्या कित्येक पट आर्थिक गैरव्यवहार वाढल्याचे दिसून आले. गेला अनेक वर्षांपासून नाशिकचा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात चुकीच्या पद्धतीने व्यवहार सुरु आहेत.

IPL_Entry_Point

विभाग