Mumbai News : हृदय प्रत्यारोपणानंतर २ वर्षांनी अंधेरीच्या विद्यार्थ्याचे प्रेरणादायी यश; बारावीत मिळवले ७४.१ टक्के गुण
Mumbai News : मुंबईतील एका मुलाने हृदयविकार असतांनाही हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया झाल्यावर जिद्दीने बारावी परीक्षेत उत्तीर्ण होत ७४.१ टक्के गुण मिळवले आहेत. त्याचे हे यश प्रेरणादायी आहे.
मुंबई: जिद्द, चिकाटी आणि सातत्य असल्यास की प्रतिकूल परिस्थितीतही माणूस लढा देत यशस्वी होत असतो. याचा प्रत्यय मुंबईतील एका मुलाने दाखवून दिला आहे. देवेंद्र दुबे असे या मुलाचे नाव असून तो हृदयविकाराने ग्रस्त असतांनाही त्याने जिद्दीने आपली बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यावर त्याने दोन वर्षानंतर ही परीक्षा देऊन तब्बल ७४,१ टक्के गुण मिळवले आहे. त्याचे हे यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
ट्रेंडिंग न्यूज
देवेंद्र दुबे हा हृदय विकाराने त्रस्त आहे. तो १५ वर्षांचा सताना त्याला हृदयरोग असल्याचे निदान झाले होते. कोरोना काळात त्याला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर २१ जानेवारी २०२१ च्या संध्याकाळी ६ वाजता एक हृदय दाता मिळाला. त्याच्यावर तब्बल आठ तास तपासणी करून दुसऱ्या दिवशी पहाटे २ वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये नेत हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
Weather Update : उकाड्यापासून मिळणार दिलासा! राज्यात पावसाचा अंदाज, तापमानात देखील होणार घट
अंधेरी येथील भवनच्या कॉलेज विद्यार्थीअसलेला दुबे हा सध्या फूट ड्रॉप नावाच्या आजाराशी देखील झुंज देत आहे. त्याचे दोन्ही पाय एकाच वेळी त्याला वापरता येत नाही. मात्र, असे असले तरी त्याने त्याची जिद्द कायम ठेवत अभ्यास सुरू ठेवला.
राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे त्याने महाविद्यालयातील गट किंवा नियमित विद्यार्थी म्हणून बोर्डाच्या परीक्षा दिली. राज्यस्तरीय बॉक्सर असलेला त्याचा भाऊ गजेंद्रला गमावूनही त्याने न खचता आपल्या आई वडिलांपासून प्रेरणा घेत जिद्दीने १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली. माझ्या आई-वडिलांचा दिलेला पाठिंबा, तसेच ज्या दात्याने मला हृदय दिले तयाची आणि देवाच्या कृपेने मी आज जिवंत आहे, त्यामुळेच मी हे यश मिळवू शकलो असे दुबे म्हणाला. भविष्यात त्याला BMS चा अभ्यास करायचा आहे अशी इच्छा त्याने बोलून दाखवली आहे.
विभाग