मुंबई : दादर पश्चिम परिसरात असलेल्या तब्बल १,४५० मिमी व्यासाच्या तानसा जलवाहिनीला मोठी गळती लागली असून यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. एकीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धारणांनी तळ गाठला आहे. दरम्यान, या गळती असलेल्या पाणी पुरवठा करणार जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे २७ मे सकाळी ८ पासून ते २८ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे व योग्य व्यवस्था करावी असे आवाहन मुंबई महानगर पालिकेने केले आहे.
दादर पश्चिममधील सेनापती बापट मार्ग आणि काकासाहेब गाडगीळ मार्ग यांच्या जंक्शनवर अस्तित्वात असलेल्या १,४५० मिमी व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती लागली आहे. या गळतीच्या दुरुस्तीचे काम मुंबई महानगर पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून शनिवार पासून हाती घेतले जाणार आहे. यामुळे २७ मे सकाळी ८ वाजता दुरुस्तीचे काम सुरू होईल. रविवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता ते पूर्ण होणार आहे. या जलवाहिनीला गळती कुठे लागली आहे, त्याचा शोध घेऊन पाइपदुरुत केले जाणार आहे.
जी दक्षिण विभाग - डिलाइल रोड बीडीडी, संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार या परिसरात २७ मे रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ७ या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.
जी उत्तर विभाग - संपूर्ण माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम विभागात, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, मोरी मार्ग, सेनाभवन परिसर, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार या परिसरात २७ मे ला सायंकाळी ४ ते रात्री १० या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.
जी दक्षिण विभाग - ना. म. जोशी मार्ग, डिलाइल रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, धोबी घाट, सातरस्ता या परिसरात २८ मे ला पहाटे ४ ते सकाळी ८ या कालावधीत पाणीपुरवठा होणार नाही.