मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : एकनाथ शिंदे आता बिघडलेत; आमच्याकडे होते तेव्हा चांगले होते; अजित पवारांचा मुख्यमंत्र्याना टोला

Ajit Pawar : एकनाथ शिंदे आता बिघडलेत; आमच्याकडे होते तेव्हा चांगले होते; अजित पवारांचा मुख्यमंत्र्याना टोला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 14, 2023 08:36 AM IST

Ajit Pawar On CM Eknath shinde : पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील एका ग्रामपंच्यायत कार्यालयाच्या उद्घाटनावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तूफान राजकीय फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला.

Ajit Pawar On CM Eknath shinde
Ajit Pawar On CM Eknath shinde

पुणे : विरोधी पक्ष नेते अजित पवार हे त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या शाब्दिक फटकेबाजीमुळे ते विरोधकांना घायाळ करत असतात. अशीच राजकीय फटकेबाजी करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील आणि आदी विरोधकांचा समाचार घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव महागणपती गावच्या ग्रामसचिवालय लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. पवार म्हणाले, आमच्यासोबत असताना एकनाथ शिंदे चांगले होते, आता तिकडे गेल्यावर मात्र जरा बिघडलेत, बिघडलेत म्हणजे...आता हेडलाईन्स होणार असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

या प्रसंगी अजित पवार यांच्या सोबत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित होते. पवार म्हणाले, मी पालकमंत्री असताना अनेक कार्यक्रम करायचो. पण आताच्या पालकमंत्र्यांनी फतवाच काढला आहे की जर कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर आधी आमची परवानगी घ्यावी लागेल. राज्यात कुणीही कुठेही फिरू शकतो. कायद्याने तास अधिकार दिला आहे. कायद्याचा आणि संविधानाचा आदर होणे गरजेचे आहे. राज्यात कायदा बिघडविण्याचा प्रयत्न करू नये.

पवार पुढे म्हणाले, आमचे सरकार होते तेव्हा काही शहाणी आमदार एसटी कामगारांच्या आंदोलनात जाऊन थेट झोपली होती. तर एक म्हणायचा 'डंके की चोट पे करूंगा.' आता यांचा डंका कुठे गेला नि चोट कुठे गेली? एसटीच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून पगार होत नाही याला जबाबदार कोण आहे ? सरकार आमचं असलं की रात्रंदिवस तुम्ही तिथं आंदोलन करणार आणि आता मात्र, तुम्ही गप्प आहात हा कुठला न्याय आहे. ज्यावेळी एसटी बंद होती तेव्हा सुद्धा आम्ही पगाराला अडीच कोटी रुपये देत होतो. तर आम्हाला उपकार केले नाही असे म्हटले जात होते. माणसं कशी बदलतात बघा. सरडा कसा रंग बदलतो. आता सरकार बदललं आता हे लोक बोलायला तयार आहे, पण सरकार मात्र, मूग गिळून गप्प बसलेत, अशी टीकाही पवार यांनी केली.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग