मराठी बातम्या  /  Lifestyle  /  What Happened History Of 30 March Know On This Day

Today in History: राजस्थान दिवस ते रौलेट विरोधी आंदोलन… ३० मार्च हा दिवस आहे अनेक घटनांचा साक्षीदार

३० मार्चचा इतिहास
३० मार्चचा इतिहास (freepik)
Hiral Shriram Gawande • HT Marathi
Mar 30, 2023 02:38 PM IST

On This Day in History : देशाच्या आणि जगाच्या इतिहासात ३० मार्च या तारखेला नोंदलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल जाणून घ्या.

राजस्थान राज्याच्या स्थापनेच्या निमित्तानं दरवर्षी ३० मार्च रोजी राजस्थान राज्य दिवस साजरा केला जातो. १९४९ साली याच दिवशी राजपुताना प्रांत भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आला. त्यानंतर राजस्थानची स्थापना करण्यात आली. राज्याच्या स्थापनेनंतर सर्वात मोठं शहर असलेल्या जयपूरला राज्याच्या राजधानीचा दर्जा देण्यात आला.

ट्रेंडिंग न्यूज

३० मार्च या दिवशी इतिहासात अनेक गोष्टी घडल्या होत्या. अनेक महनीय व्यक्तींचा जन्म या दिवशी झाला, तर काही नामवंत लोक जग सोडून गेले. जाणून घेऊया ३० मार्च या दिवसाचा ठळक इतिहास…

आजचा इतिहास

१९०८ - ३० व ४० च्या दशकातील चित्रपट अभिनेत्री देविका राणी चौधरी रोरिक यांचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी झाला होता.

१९१९ - महात्मा गांधी यांनी ३० मार्च १९१९ रोजी रौलेट कायद्याविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं.

१९९२ - सत्यजित रे यांना ३० मार्च १९९२ रोजी ऑस्कर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

१९९२ - भारतीय गायिका पलक मुच्छाल यांचा जन्म ३० मार्च १९९२ रोजी झाला.

२००२ - लोकप्रिय भारतीय कवी आणि गीतकार आनंद बक्षी यांचं ३१ मार्च २००२ रोजी निधन झालं.

२०११ - टॉलिवूड अभिनेत्री नूतन प्रसाद यांचे ३० मार्च २०११ रोजी निधन झाले.

२०१२ - समाजशास्त्राच्या प्रसिद्ध प्राध्यापक अक्विला बार्लास कियानी यांचे ३० मार्च २०१२ रोजी निधन झाले.

२०१७ - १९३२ पासून सुरू असलेला दिल्लीतील प्रसिद्ध आणि जुन्या सिनेमा हॉलपैकी एक रीगल सिनेमा हॉल ३० मार्च २०१७ रोजी बंद झाला.

 

(वरील लेखात काही निवडक घटना दिल्या आहेत. या खेरीज भारतीय इतिहासात आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या होत्या.)

WhatsApp channel

विभाग