मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Brain Tumor: आता यूरिन टेस्टने कळणार ब्रेन ट्यूमर आहे की नाही, शास्त्रांचा दावा

Brain Tumor: आता यूरिन टेस्टने कळणार ब्रेन ट्यूमर आहे की नाही, शास्त्रांचा दावा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 04, 2023 11:52 AM IST

World Cancer Day: ब्रेन ट्यूमर हा एक जीवघेणा आजार असून त्याचे निदान करणे कठीण आहे. संशोधकांनी एक खास उपकरण तयार केले आहे, ज्याच्या मदतीने यूरिन टेस्ट द्वारे ब्रेन ट्यूमरचा शोध लावला जाऊ शकतो.

ब्रेन ट्यूमर
ब्रेन ट्यूमर (pexels)

Urine Test to Detect Brain Tumor: जपानमधील संशोधकांच्या एका टीमने एक नवीन उपकरण विकसित केले आहे, जे यूरिनमधील म्हणजेच लघवीतील मेम्ब्रेन प्रथिन शोधते, जे रुग्णाला ब्रेन ट्यूमर आहे की नाही हे निर्धारित करण्यात मदत करू शकते. टोकियो विद्यापीठाच्या सहकार्याने जपानच्या नागोया विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक ताकाओ यासुई आणि प्राध्यापक योशिनोबू बाबा यांच्या नेतृत्वाखालील संशोधन गटाने नॅनोवायरचा वापर करून ब्रेन ट्यूमर ईव्हीसाठी एक नवीन अॅनालिसिस प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.

नागोया युनिव्हर्सिटीच्या मते, मेंदूच्या ट्यूमरसाठी जगण्याचा दर हा गेल्या ३० वर्षांपासून बदलेला नाही आणि हे त्याचे उशिरा निदान झाल्यामुळे होते. अनेकदा, बोलण्याची हालचाल कमी होणे यासारख्या न्यूरोलॉजिकल लक्षणांच्या सुरुवातीनंतरच डॉक्टरांना मेंदूतील गाठी आढळतात. यावेळी, ट्यूमर लक्षणीय आकारात पोहोचेलेले असते. एखाद्या व्यक्तीच्या लघवीमध्ये ट्यूमर-संबंधित एक्स्ट्रासेल्युलर वेसिकल्स (EVs) ची उपस्थिती ही त्यांना ब्रेन ट्यूमर असल्याचे संभाव्य संकेत आहे. ईव्ही हे नॅनोपार्टिकल्स आहेत जे सेल-टू-सेल कम्युनिकेशनसह विविध कार्ये करतात. यासुई म्हणाले, सध्या ईव्ही अलगाव आणि शोधण्याच्या पद्धतींना दोनपेक्षा जास्त उपकरणे आणि ईव्ही वेगळे करण्यासाठी आणि नंतर शोधण्यासाठी चाचणी आवश्यक आहे.

संशोधकांचा असा विश्वास आहे की मेंदूचा कर्करोग शोधण्यासाठी लघवीमध्ये असलेले मुख्य झिल्ली प्रोटीन वापरले जाऊ शकते. ते म्हणाले, यामुळे आक्रमक चाचण्यांची गरज नाहीशी होऊ शकते आणि शस्त्रक्रियेसाठी ट्यूमर लवकर शोधण्याची शक्यता वाढू शकते. यासुई म्हणाली, शरीरातील अनेक द्रवांचा वापर करून लिक्विड बायोप्सी करता येते. परंतु रक्त तपासणी धोकादायक असते. यूरिन टेस्ट ही एक प्रभावी, सोपी आणि गैर-आक्रमक पद्धत आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या