Cardamom Benefits for Skin Care: भारतीय स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. प्रत्येकाची स्वतःची एक खासियत असते. हे मसाले जेवणाची चव वाढवतात. याचे अनेक आरोग्य फायदे मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का की हे मसाले तुमच्या त्वचेसाठी चमत्कारही करू शकतात. भारतीय स्वयंपाकघरात तुम्ही बिर्याणी बनवत असाल किंवा कोणतीही खास स्वीट डिश, वेलची हा जवळपास प्रत्येक डिशचा स्टार पदार्थ आहे. अनेक डिशेशमध्ये वेलचीचा सर्वाधिक वापर केला जातो. याचा वापर करून तुम्ही नैसर्गिक चमकणारी त्वचा मिळवू शकता. जेवणाची चव वाढवणाऱ्या या मसाल्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्यही वाढवू शकता. यासाठी तुम्ही कशा प्रकारे वेलची वापरू शकता हे जाणून घेऊयात.
डागरहित चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी तुम्ही या प्रकारे वेलची वापरू शकता. यासाठी किमान ५-१० वेलची बारीक करून घ्या. आता या पावडरने तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक फेस मास्क तयार करू शकता. वेलची पावडरमध्ये मध आणि दूध मिसळून तुम्ही फेस मास्क तयार करू शकता. ही पेस्ट रोज चेहऱ्यावर लावता येते.
वेलचीचे पाणी वापरूनही तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता. यासाठी ५-१० वेलची एका ग्लास पाण्यात छान उकळून घ्या. पाण्याला चांगली उकळी आल्यावर आणि वेलचीचा रंग हलका झाला की ते बंद करून थंड होऊ द्या. पाणी थंड झाल्यावर चेहरा धुवा किंवा टोनर म्हणून स्प्रे करा.
वेलचीचा वापर करून त्वचेला ग्लोइंग करण्यासोबतच श्वासाच्या दुर्गंधीपासूनही सुटका मिळू शकते. या वेलचीच्या पाण्याने तुम्ही दिवसातून दोनदा गार्गल करू शकता. यामुळे अन्न खाल्ल्यानंतर श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल. काही लोकांना वेलचीची ऍलर्जी असते, जर तुम्हालाही अशी ऍलर्जी असेल तर वेलची वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या