मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Fall Remedies: 'हे' घरगुती उपाय केस गळतीवर आहेत रामबाण उपाय! लगेच दिसेल फरक

Hair Fall Remedies: 'हे' घरगुती उपाय केस गळतीवर आहेत रामबाण उपाय! लगेच दिसेल फरक

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Oct 03, 2022 10:19 AM IST

Hair Care: पावसाळा असो किंवा हिवाळा कधीही केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

हेअर केअर
हेअर केअर (Freepik)

Ayurvedic Tips: केसांची काळजी घेण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो, परंतु केसांशी संबंधित समस्या नेहमीच असतात. जसे की कोंडा होणे, केस तुटणे किंवा गंभीरपणे गळणे. बदलत्या ऋतूमध्ये केसगळतीमुळे लोकांना त्रास होतो. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. आयुर्वेद तज्ञ डॉक्टर निकिता कोहलीने देखील तिच्या इंस्टाग्रामवर या टिप्सबद्दल सांगितले आहे. काही घरगुती उपाय जाणून घ्या

१) जास्वंदाचे फुल

गळणाऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी जास्वंदाची फुलं आणि पानं बारीक करून पेस्ट बनवा आणि त्यात दही मिसळा. गुळगुळीत पेस्ट बनवा आणि केसांवर लावा. काही वेळ असेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने आणि शैम्पूने केस धुवा. सर्वोत्तम परिणामांसाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा ही रेसिपी वापरून पहा.

२) कोरफड

कोरफड हे केस आणि त्वचा या दोन्हींसाठी उत्तम आहे. त्याचे एक पान घ्या आणि ते चांगले धुवा. त्यानंतर त्याचे जेल तुमच्या टाळूवर लावा. तासभर असेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवा.

३) कांद्याचा रस

केसांच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कांद्याचा वापर करू शकता.कांदा लावण्यासाठी ब्लेंडरमध्ये कांदा टाका आणि नंतर त्याच्या लगद्यामधून रस काढा. आता रस एका भांड्यात ठेवा आणि कापसाच्या मदतीने आपल्या टाळूवर लावा. काही वेळ असेच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा. केसगळतीपासून सुटका मिळवण्यासाठी आठवड्यातून दोनदा हा उपाय करा.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग