मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Immunity: प्रतिकारशक्ती कमी झाल्याने लहान मुलांमध्ये वाढतोय संसर्गाचा धोका!

Immunity: प्रतिकारशक्ती कमी झाल्याने लहान मुलांमध्ये वाढतोय संसर्गाचा धोका!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 06, 2023 04:12 PM IST

Parenting Tips: २ वर्षे लॅाकडाऊनमुळे घरात रहावे लागल्याने लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे आणि संक्रमणाची संवेदनक्षमता वाढीस लागली आहे.

Health Care
Health Care (Freepik )

Children Immunity: लॉकडाउनमुळे सतत २ वर्षे घरी राहिल्याने लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत गेली. हवेच अनेक प्रकारचे विषाणु असतात आणि आपण नियमित त्यांच्या संपर्कात येत असतो आणि त्याद्वारे आपली प्रतिकारशक्ती मजबूत होत जाते; परंतु तब्बल २ वर्षे लॅाकडाऊनमुळे घरात रहावे लागल्याने लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे आणि संक्रमणाची संवेदनक्षमता वाढीस लागली आणि म्हणूनच मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. वरिष्ठ सल्लागार बालरोगतज्ञ आणि किशोर समुपदेशक, अंकुरा हॉस्पिटल्स, पुणेच्या डॉ. सीमा जोशी यांच्याकडून अधिक जाणून घेऊयात… 

कोरोना महामारीनंतर आता पुन्हा नव्या आजाराने डोकं वर काढलं असून या आजाराची सुरुवात देखील चीनमधूनच झाली आहे. चीनच्या उत्तर पूर्व प्रांतातील लियाओनिंग भागातील मुलांमध्ये न्यूमोनिया सारखी लक्षणं आढळून आली आहेत. काही महिन्यापासून चीनमध्ये न्यूमोनियाचा लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात परिणात होताना दिसत आहे. तापामुळे मुलांना रुग्णालयात दाखल केले जात आहे तसेच संरक्षणात्मक उपाययोजना जसे मास्कचा वापर, शारीरीक स्वच्छतेच्या पालन करण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. या संसर्गात लहान मुलांमध्ये खोकला, सर्दी, ताप अशी लक्षणे दिसत आहेत. अशी लक्षणं दिसल्यास मुलांना शाळेत न पाठवण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. भारतात या आजाराबाबत काळजी करण्याची गरज नाही, कारण त्याची लक्षणे अद्याप देशात दिसून आलेली नाहीत. 

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये न्युमोनियाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये उच्च ताप येणे, फुफ्फुसाला सूज येणे, फुफ्फुसात वेदना, दमा, कमकुवत प्रतिकारशक्ती अशी लक्षणे दिसून येतात. न्युमोनियाचा संसर्ग फुफ्फुसांमध्ये जास्त प्रमाणात पसरतो. तसंच भूक न लागणे, कफ, खोकला, छातीत दुखणे, खोकताना रक्तस्त्राव होणे ही देखील न्युमोनियाची लक्षणे आहेत.

चीनच्या उत्तरी भागांमध्ये थंडी वाढली आहे. या दिवसांमध्ये बीजिंग आणि इतर उत्तरेतल्या शहरांमध्ये थंडीबरोबरच प्रदूषणदेखील वाढीस लागते आणि सामान्यतः या दिवसांमध्ये लहान-मोठे सगळ्यांनाच श्वसनाचा त्रास होतो; परंतु आत्ताची तापाची साथ वेगळी आहे. हा ताप जास्त करून लहान मुलांमध्ये पसरत असल्याने विशेष काळजीचा ठरला आहे.

WhatsApp channel