मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Straightening: घरी हेअर स्ट्रेटनिंग करताय? चुकूनही करु नका या चुका, खराब होतील केस

Hair Straightening: घरी हेअर स्ट्रेटनिंग करताय? चुकूनही करु नका या चुका, खराब होतील केस

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 10, 2023 12:02 PM IST

Hair Care Tips: स्ट्रेट केसांमुळे तुमचा लूक पूर्णपणे बदलतो. जर तुम्ही घरी हेअर स्ट्रेटनर वापरत असाल तर काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. येथे आपण कोणत्या स्टेप्स फॉलो करावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेऊ शकता.

हेअर स्ट्रेटनिंग करताना या स्टेप्स फॉलो करा
हेअर स्ट्रेटनिंग करताना या स्टेप्स फॉलो करा

Hair Straightening Mistakes: सिल्की- स्ट्रेट केस कोणाला आवडत नाहीत? स्ट्रेटनिंगसाठी लोक पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करतात. जर तुम्हाला खूप पैसे खर्च करायचे नसतील तर अधून- मधून घरीच केस स्ट्रेट करता येतात. बरेच लोक हे स्ट्रेटनरच्या मदतीने देखील करतात. जर तुम्हाला घरच्या घरी स्ट्रेटनरचे उत्तम परिणाम मिळवायचे असतील तर तुम्ही येथे सांगितलेल्या काही ट्रिक्स वापरू शकता. तसे, वारंवार केस स्ट्रेट केल्याने तुमचे केस खराब होऊ शकतात आणि ते तुटू शकतात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला एखाद्या खास प्रसंगासाठी तयार व्हायचे असेल तेव्हा स्ट्रेट करता येते. आपण कोणत्या चुका करू नये ते येथे जाणून घ्या.

धुणे आवश्यक आहे

केस स्ट्रेट करण्यापूर्वी प्रथम आपल्याला ते स्वच्छ करावे लागतील. केस खराब आणि चिकट असल्यास स्ट्रेट करणे शक्य होणार नाही. आपले केस शॅम्पू करा आणि ते कोरडे करा. लक्षात ठेवा ओल्या केसांवर कधीही स्ट्रेटनर वापरू नका.

कोरडे झाल्यानंतर स्ट्रेट करा

जर केस कोरडे झाल्यानंतर त्यातील गुंता सोडवून घ्या. यासाठी केसांच्या ब्रशने किंवा रुंद दांतांच्या कंगव्याने केस विंचरा. केसांचे मध्यभागी पकडून आधी खालचा गुंता सोडवा. नंतर वरच्या भागातील गुंता काढा. जास्त जोरात कंगवा फिरवू नका, याने केस तुटण्याचा धोका असतो.

हीट प्रोटेक्शन करा

स्ट्रेटनिंगने केसांमध्ये उष्णता वाढते. यामुळे नुकसान होऊ शकते. म्हणून हीट देणारे कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी हीट प्रोटेक्शन सीरम किंवा स्प्रे वापरण्याची खात्री करा. हळूहळू, तुमचे केस कोरडे आणि फ्रिजी होऊ शकतात आणि लुक खराब करू शकतात.

टेम्प्रेचर तपासा

आपले केस विभागांमध्ये विभागून स्ट्रेटनिंग करा. स्ट्रेटनरचे तापमान देखील तपासा. जास्त उष्णतेमुळे केस खराब होतात आणि ते तुटतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग