मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: चाणक्याच्या मते, ‘या’ ३ गोष्टी माणसाची साथ कधीच सोडत नाहीत

Chanakya Niti: चाणक्याच्या मते, ‘या’ ३ गोष्टी माणसाची साथ कधीच सोडत नाहीत

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 06, 2022 08:30 AM IST

आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात मानवाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन केल्याने माणूस आपले जीवन यशस्वी करू शकतो.

चाणक्य नीती
चाणक्य नीती

आचार्य चाणक्य हे उत्तम शिक्षक असण्यासोबतच एक उत्तम मुत्सद्दी, रणनीतीकार आणि अर्थशास्त्रज्ञ देखील होते. चाणक्याची धोरणे आजही प्रसिद्ध आहेत. जीवनात यश मिळविण्यासाठी लोक अजूनही या धोरणांचे पालन करतात. निती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टी सांगितल्या आहेत. नीती शास्त्रामध्ये अशा ३ गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या नेहमी व्यक्तीसोबत राहतात. या गोष्टी अशा आहेत की मरेपर्यंत त्या माणसाची साथ सोडत नाहीत. जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी...

विद्या मित्रं प्रवासेषु भार्या मित्र गृहेषु च।

व्याधितस्यौषधं मित्र धर्मो मित्रं मृतस्य।।

ज्ञान

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्ञान हे माणसाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. तो आयुष्यभर व्यक्तीसोबत राहतो. प्रत्येकजण तुम्हाला आयुष्यात सोडून जाऊ शकतो. पण ज्ञान ही एकच गोष्ट आहे जी कायम तुमच्यासोबत राहते. बुद्धिमत्तेच्या जोरावर माणूस कोणत्याही कठीण प्रसंगातून बाहेर पडू शकतो. शिक्षणानेच माणसाला यश मिळते.

औषध

कोणत्याही आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी औषधही खऱ्या मित्राप्रमाणे काम करते. यामुळे व्यक्ती लवकर बरी होते. औषधाच्या मदतीने, व्यक्ती कोणत्याही समस्येपासून सहजपणे मुक्त होऊ शकते. औषधाने आरोग्य सुधारते.

धर्म

चाणक्याच्या मते, व्यक्तीने धर्माला संपत्तीपेक्षा जास्त ठेवावे. धर्म माणसाला जिवंत असतानाच आधार देत नाही तर मृत्यूनंतरही त्याला आधार देतो. धर्म माणसाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. धर्म आणि कर्मामुळे माणसाला मृत्यूनंतरही नेहमी स्मरण केले जाते.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग