मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  दुःखद! जेष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन, ६१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दुःखद! जेष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन, ६१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Payal Shekhar Naik HT Marathi
May 01, 2022 10:14 AM IST

प्रेमा यांच्या अचानक झालेल्या निधनाने चित्रपटसृष्टी देखील शोकाकुळ झाली आहे.

प्रेमा किरण
प्रेमा किरण

'जाऊया डबल सीट रं लांब लांब लांब' म्हणत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्री प्रेमा किरण यांचं मुंबईत राहत्या घरी निधन झालं आहे. प्रेमा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी प्रेमा यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेमा यांच्या अचानक झालेल्या निधनाने चित्रपटसृष्टी देखील शोकाकुळ झाली आहे. त्यांच्या अचानक निधनाने चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.

प्रेमा यांनी काही काळापूर्वी झी मराठी वाहिनीवरील 'हे तर काहीच नाही' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यात त्यांनी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच अनेक किस्से सांगितले होते. प्रेमा यांनी ८० आणि ९० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. प्रेमा आणि लक्ष्मीकांत यांची जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी होती. त्यांनी एकत्र 'धूमधडाका', 'दे दणादण' यांसारख्या चित्रपटात काम केलं होतं. याशिवाय प्रेमा यांनी 'गडबड घोटाळा', 'अर्धांगी', 'सौभाग्यवती सरपंच', 'माहेरचा आहेर', 'अर्जुन देवा', 'उतावळा नवरा' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धूमधडाका’या चित्रपटात त्यांनी अंबाक्काची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीसोबतच त्या एक निर्मात्यासुद्धा होत्या. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. प्रेमा यांनी फक्त मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी आणि बंजारा भाषेतील चित्रपटांमध्येही काम केलं होतं. त्यांच्या अचानक निघून जाण्याने मराठी कलाकारांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

IPL_Entry_Point