मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Supriya Pathare:ठिपक्यांची रांगोळीमधील अभिनेत्रीच्या मुलाचा ठाण्यात पावभाजी ट्रक

Supriya Pathare:ठिपक्यांची रांगोळीमधील अभिनेत्रीच्या मुलाचा ठाण्यात पावभाजी ट्रक

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 18, 2022 12:04 PM IST

सुप्रिया पाठारेंच्या मुलाचा ठाण्यात पावभाजी ट्रक, ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद. त्यांच्या मुलाच्या ट्रकचे नाव 'मharaj' असे आहे.

सुप्रिया पाठारे
सुप्रिया पाठारे (HT)

अनेक कलाकारांची मुले ही त्यांच्या आई आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करताना दिसतात. याला काही अपवादात्मक उदाहरणे देखील आहेत. काही स्टारकिड्सने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याऐवजी त्यांच्या आवडीचे वेगळे क्षेत्र निवडले आहे. अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या मुलाने देखील अभिनय क्षेत्रात करिअर करण्याऐवजी दुसरे क्षेत्र निवडले आहे.

सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहिर हा एक शेफ आहे. त्याने ठाण्यात स्वत:चा फूड ट्रक लावला आहे. तो स्वत: पावभाजी बनवून खायला घाततो. त्याने जुलै महिन्यातच ठाण्यात हा फूड ट्रक लावण्यास सुरुवात केली आहे. त्याने फूड ट्रकवर 'मharaj' असे लिहिले आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच्या या ट्रकचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मिहिरने अमेरिकेत असताना शेफ म्हणून काम केले आहे. तो प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या 'खाना खजाना' या शोमध्ये दिसला होता. मिहिर जेव्हा मायदेशी परतला तेव्हा त्याने आता हा छोटा व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. त्याला या व्यवसायात त्याचा मित्र आदेशने मदत केली आहे.

दिग्गज अभिनेत्री अलका कुबल यांची लेक वैमानिक आहे. तर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ हा शेफ आहे. त्यापाठोपाठ आता अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा देखील आता वेगळ्या क्षेत्रात आला आहे. त्याने स्वत:चा पावभाजीचा ट्रक लावला आहे. तो देखील शेफ आहे.

IPL_Entry_Point

विभाग