मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Samrat Prithviraj: अक्षयच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ला तो मान मिळणं कठीण, कारण…

Samrat Prithviraj: अक्षयच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ला तो मान मिळणं कठीण, कारण…

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jun 13, 2022 03:40 PM IST

अक्षय कुमारचा सिनेमा सम्राट पृथ्वीराजने बॉक्स ऑफीसवर फ्लॉपचा शिक्का पाहिला. अक्षय कुमार संजय दत्त आणि सोनू सूदसारखी मोठी स्टारकास्ट असूनही त्यात यशराज बॅनरसारखा मोठा बॅनर असूनही फिल्म दर्शकांना आकर्षित करु शकली नाही.

सम्राट पृथ्वीराज चित्रपट
सम्राट पृथ्वीराज चित्रपट (हिंदुस्तान टाइम्स)

बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) ची फिल्म सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj) बॉक्स ऑफिस (Box Office) वर फ्लॉप (Flop) ठरली आहे. अक्षय कुमार, संजय दत्त आणि सोनू सूद अशी मोठी  स्टार कास्ट आणि  यशराज चा बॅनर असूनही फिल्म दर्शकांना आपल्याकडे खेचण्यात कमालीची अपयशी ठरली आहे. फिल्मचं कलेक्शन अपेक्षेनुसार खूप कमी आहे. गेल्या १० दिवसात चित्रपटाने फक्त ६० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. हा आकडा पाहता या चित्रपटाला १०० कोटी क्लबमध्ये सहभागी होण्याचा मान मिळणे कठीण आहे, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.

कसं आहे फिल्मचं कलेक्शन?

सम्राट पृथ्वीराजने पहिल्या दिवशी १०.७० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाकडून फारशा अपेक्षा ठेवल्या गेल्या नव्हत्या.दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने १२.६० कोटी आणि तिसऱ्या दिवशी१६.१० कोटींची कमाई केली होती.यानंतर चित्रपटाने चौथ्या आणि पाचव्या दिवशी ५ कोटी रुपये आणि ४.२५ कोटी रुपयांची अनुक्रमे कमाई केली होती. सहाव्या दिवशी चित्रपटाने ३.६० कोटी रुपये, सातव्या दिवशी २.८० कोटी रुपये, आठव्या दिवशी १.५० कोटी रुपये, नवव्या दिवशी २.५० कोची रुपये तर दहाव्या दिवशी ३.२५ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं.

कलेक्शनमध्ये किती प्रमाणात घसरण

आठव्या दिवसापेक्षा नवव्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये ६६.६७ टक्के वाढ पाहायला मिळाली. तिथेच १०व्या दिवशी ३० टक्के वाढ पाहायला मिळालीय. याशिवाय जर पहिल्या आणि दुसऱ्या विकेंडबद्दल बोलायचं झालं तर फिल्म कलेक्शनमध्ये८१.६० टक्के घसरण पाहायला मिळाली. चित्रपटाचं एकंदरीत कलेक्शन ६२.३० कोटी रुपये पाहायला मिळालं.

काय आहे सम्राट पृथ्वीराजचं IMDb रेटींग

अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, संजय दत्त आणि सोनू सूद स्टारर फिल्म सम्राट पृथ्वीराजला ७.८ IMDb रेटींग मिळालं आहे. फिल्मचं हे रेटींग ४६ हजार वोट्स च्या आधारांवर दिलं गेलं आहे. मानुषी छिल्लरने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मानुषानेही चित्रपटाचं खूप प्रमोशन केलंय आणि अक्षय बरोबर देशातल्या वेगवेगळ्या शहरात जात तिनं लोकांशी संवाद साधला आहे.

IPL_Entry_Point