मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Riteish Deshmukh: महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन ठरला रितेश देशमुख, स्टाईलने लावले सर्वांना वेड

Riteish Deshmukh: महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन ठरला रितेश देशमुख, स्टाईलने लावले सर्वांना वेड

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 10, 2024 10:53 AM IST

Maharashtracha Favourite Kon: ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३' हा पुरस्कार सोहळा कधी आणि कुठे पाहाता येणार हे देखील जाणून घ्या...

Riteish Deshmukh
Riteish Deshmukh

Maharashtracha Favourite Kon Stylist Icon: नव्या वर्षाची चाहूल लागली की मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या पुरस्काराचे वेध रसिक मनाला लागत असतात. गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना आणि त्याच्याशी संबंधित विभागांना सन्मानित करणारा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन' हा पुरस्कार अभिनेता रितेश देशमुखला मिळाल्याचे समोर आले आहे.

झी टॉकीज या वाहिनीच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२३ या पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर ‘महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन’ पुरस्कार रितेश देशमुखने पटकावला आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षीही स्टाईल आयकॉन बनवण्याचा मान रितेशला मिळाला आहे.
वाचा: आधी पाठलाग नंतर शिवीगाळ; अभिनेत्याबरोबर मुंबईत घडला धक्कादायक प्रकार

अभिनेता रितेश देशमुख हे मराठमोळं नाव बॉलीवूडमध्ये तर गाजत आहेच पण या नावाने गेल्या वर्षभरात मराठी सिनेसृष्टीत वलय निर्माण केले आहे. मराठी सिनेसृष्टीतल्या आपल्या पदार्पणातच रितेशच्या ‘लय भारी’ सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि गेल्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आवडता अभिनेता, उत्तम दिग्दर्शक, यासह आता रितेश देशमुख 'महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन' सुद्धा ठरला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या कलाकारांना देखील नामांकन

यंदा या पुरस्काराच्या स्पर्धेत अभिनेता अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, सिद्धार्थ जाधव, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ आणि ललित प्रभाकर यांची नावे होती. पण 'महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन' म्हणून प्रेक्षकांनी रितेश देशमुख याला भरघोस मते देत पसंतीचा कौल दिला.

कधी आणि कुठे पाहायला मिळणार सोहळा?

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या पुरस्कार सोहळ्याकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. रविवार दिनांक १८ फेब्रुवारी संध्याकाळी ७ वाजता झी टॉकीज वाहिनीवर हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे चित्रपटाशी निगडित पडद्यावरचे आणि पडद्यामागचे कलाकार यांना प्रेक्षकांच्या पसंतीतून 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' ठरवले जात असल्याने या पुरस्काराची विशेष चर्चा रंगली आहे.

सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' या पुरस्कार सोहळ्याची .या पुरस्कारांमध्ये विशेष लक्ष वेधून घेणारा पुरस्कार म्हणजे 'महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन.' गेल्या वर्षी रितेश देशमुख यांच्या वेड या सिनेमांने सर्व वयोगटातील प्रेक्षकांना अक्षरशः वेडं केलं होतं . या सिनेमातील संवाद आणि गाणी तर प्रत्येकाच्या ओठावर रुळलेली होती . रितेशने त्याच्या अभिनयाने आणि दिग्दर्शन कौशल्याने प्रेक्षकांना आपलंसं केलंच आहे तर आता त्याच्या स्टाईलनेही अनेकांना भुरळ घातली आहे . त्यामुळेच यावर्षी झी टॉकीज वाहिनी तर्फे देण्यात येणारा 'महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन' हा पुरस्कार रितेश देशमुख याच्या नावावर जमा झाला आहे .

WhatsApp channel