मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: गौरी कुलकर्णी 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसणार नाही, कारण...

Aai Kuthe Kay Karte: गौरी कुलकर्णी 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसणार नाही, कारण...

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 20, 2023 12:09 PM IST

Gauri Kulkarni Accident News : भरधाव वेगाने येणाऱ्या बाईकस्वाराने अभिनेत्री गौरी कुलकर्णीच्या स्कुटीला जोरदार धडक दिली आहे.

Gauri Kulkarni
Gauri Kulkarni

Gauri Kulkarni Accident News : छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून आई कुठे काय करते ही पाहिली जाते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णीचा अपघात झाला आहे. गौरीला गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र तिने काही दिवस मालिकेतून ब्रेक घेतला आहे.

ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी गौरी जात असलेल्या मार्गावर एक बाईकस्वार समोरून भरधाव वेगात आला आणि त्याने गौरीच्या स्कुटीला समोरून धडक दिली. यामुळे तिची स्कुटी स्लीप झाली. या अपघातामध्ये तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तिला डॉक्टरांनी तीन आठवडे आराम करण्यास सांगितला आहे. तसेच तिच्या स्कूटीचे मोठे नुकसान झाले आहे. चाहते गौरी लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील यश आणि गौरीची प्रेक्षकांच्या विशेष पंसतीला उतरते आहे. या जोडीवर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. मात्र आता पुढचे काही दिवस गौरी मालिकेत दिसणार नाही.

WhatsApp channel
विभाग