मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Vedanta Dividend : वेदांताचा धमाका! एकाच वर्षात तिसऱ्यांदा लाभांश जाहीर, गुंतवणूकदार खूश

Vedanta Dividend : वेदांताचा धमाका! एकाच वर्षात तिसऱ्यांदा लाभांश जाहीर, गुंतवणूकदार खूश

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Nov 24, 2022 03:50 PM IST

वेदांताच्या मंगळवारी २२ नोव्हेंबरला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रत्येकी १ रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्सवर १७५०% अंतरिम लाभांश मंजूर केला आहे.

Vedanta HT
Vedanta HT

Vedanta dividend : वेदांताच्या मंगळवारी २२ नोव्हेंबरला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रत्येकी १ रुपये दर्शनी मूल्याच्या शेअर्सवर १७५०% अंतरिम लाभांश मंजूर केला आहे.

उद्योगपती अनिल अगरवाल यांच्या वेदांता कंपनीने मंगळवारी प्रत्येक शेअर्सवर १७.५ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. खाण क्षेत्रातील या दिग्गज कंपनी यासाठी ६५०५ कोटी रुपये खर्च करणार आहे. चालू आर्थिक वर्षात २०२३ मध्ये वेदांतातर्फे जाहीर झालेला हा तिसऱा अंतरिम लाभांश आहे. वेदांताने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या २२ नोव्हेंबरला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत १ रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअर्सवर १७५० टक्के अंतरिम लाभांश देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे.

लाभांशासाठी रेकाॅर्ड तारीख

वेदांतासाठी रेकाॅर्ड तारीख ३० नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ वेदांताचा शेअर्स २९ नोव्हेंबरला एक्स डिव्हिडंटच्या रुपात ट्रेड करेल. याआधी कंपनीने २९ एप्रिलला ३१.५ रुये प्रति शेअर्ससाठी अंतरिम लाभांश जाहीर केला होता. चालू आर्थिक वर्षांतील हा पहिला लाभांश होता. कंपनीने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ४५ रुपये प्रति शेअर्स लाभांश (४५०० टक्के) दिला होता.

महिन्याभरात शेअर्समध्ये १० टक्के वाढ

गेल्या १० दिवसांमध्ये वेदांताचे शेअर्स एनएसईवर ०.८१ टक्के वाढून २१०.४० रुपयांवर बंद झाले. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये १०.१७ टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये १२.४६ टक्के घसरण झाली होती.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग