मराठी बातम्या  /  बिझनेस  /  BHIM-UPI Guideline: यूपीआय पेमेंट करताना ही घ्या काळजी

BHIM-UPI Guideline: यूपीआय पेमेंट करताना ही घ्या काळजी

Mar 09, 2023 12:35 PM IST

UPI Campaign : यूपीआयच्या वापरासंदर्भात शहरी ते ग्रामीण पातळीवर जनजागृती करण्यासाठी नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन आॅफ इंडिया (एनपीसीआयने) काही मार्गदर्शक सूत्रे जारी केली आहे.

UPI HT
UPI HT

rutuUPI Campaign : यूपीआय संदर्भात एनपीसीआयने केलेल्या नव्या जनजागृती मोहिमेममध्ये मिसेस राव यूपीआय पेमेंट सेफ्टीच्या नव्या टीप्स घेऊन आल्या आहेत. जेणेकरुन शहरी भागासह ग्रामीण पातळीवर यूपीआयद्वारे पेमेंट करण्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यूपीआयचा वापर हा प्रामुख्याने कोविड काळात मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे कोणत्याही कटकटीशिवाय व्यवहार अत्यंत सुलभ होऊ लागले. यूपीआयच्या माध्यमातून बँक खात्यातून थेट संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात व्यवहार करता येतात. त्यामुळे जेंव्हा तुम्ही तुमचे पैसे यूपीआयद्वारे हस्तांरित करता तेंव्हा पुढील बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे, यासंदर्भात मिसेस राव सांगतात की,

१- यूपीआय पीन - यूपीआय पीन टाकल्यानंतरच पैसे हस्तांरित होतात. जेंव्हा एखाद्या व्यक्तीला पेमेंट करायचे असेल तेंव्हाच यूपीआय पीनची गरज असते. पेमेंट आपल्या खात्यात जमा होण्यासाठी यूपीआय पीनची आवश्यकता नसते.

२. यूपीआय आयडी - ज्या व्यक्तीला आपण पैसे देणार असू त्यांचे यूपीआय आयडी व्हेरिफिकेशन करणे आवश्यक ठरते. व्हेरिफिकेशन केल्याशिवाय पैसे हस्तांरित करु नका

३ - यूपीआय पीन शेअर करु नका - यूपीआयच्या अॅपवर असतानाच तुम्ही यूपीआय पीनचा वापर करा. आपण सेट केलेला यूपीआय पीन कोणालही शेअर करु नका

४. क्यूआर को़ड - यूपीआचा क्यूआर कोड फक्त पेमेट करण्यासाठीच वापरला जातो. पैसे मिळण्यासाठी त्याचा वापर करता येत नाही.

५, स्क्रीन शेअरिंग किंवा एसएमएस - कोणत्याही व्यक्तीला स्क्रीन शेअरिंग अथवा एसएमएस पाठवू नका.

या यूपीआय सेफ्टी शिल्डचा वापर करुन प्रत्येक यूजर्स सुरक्षितपणे व्यवहार करु शकतात. यूपीआय पेमेंटसंदर्भात जनजागृतीसाठी एनपीसीआयने मिसेस राव सांगतात अशी संकल्पना आणली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून हे कॅम्पेन केले जात आहे. 'जब भी यूपीआय से पेमेंट करेंगे, यूपीआय सेफ्टी शिल्ड की चार बातें याद रखेंगे' असे त्या यात सांगत आहे.

हा व्हिडिओ पाहण्यासाठी https://www.youtube.com/watch?v=3sjvZQIz4Xo या लिंकवर क्लिक करा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग