मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Air India Hiring plan : एअर इंडियामध्ये जम्बो भरती; ९०० पायलट, ४२०० केबिन क्रूच्या जागा भरणार

Air India Hiring plan : एअर इंडियामध्ये जम्बो भरती; ९०० पायलट, ४२०० केबिन क्रूच्या जागा भरणार

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 27, 2023 12:15 PM IST

Air India Hiring plan : एअर इंडिया २०२३ मध्ये ४२०० पेक्षा अधिक केबिन क्रू, ९०० पायलट्सची नियुक्ती करण्याची योजना आखत आहे. केबिन क्रूला १५ आठवड्यांपर्यंत ट्रेनिंग दिले जाईल. यादरम्यान सिक्युरिटी, सर्व्हिस स्कीलसंदर्भात अधिक विशद केले जाईल.

Air India HT
Air India HT

Air India Hiring plan : एअर इंडिया २०२३ मध्ये ४२०० पेक्षा अधिक केबिन क्रू, ९०० पायलट्सची नियुक्ती करण्याची योजना आखत आहे. केबिन क्रूला १५ आठवड्यांपर्यंत ट्रेनिंग दिले जाईल. यादरम्यान सिक्युरिटी, सर्व्हिस स्कीलसंदर्भात अधिक विशद केले जाईल.

टाटा समूहाच्या एअर इंडियाने नव्या वर्षांसाठी बहुउद्देशीय योजना बनवली आहे. एअर इंडिया २०२३ मध्ये ४२०० पेक्षा अधिक केबिन क्रू आणि ९०० पायलट्स नियुक्त करण्यावर विचार करत आहे. केबिन क्रूला १५ आठवड्यांपर्यंत ट्रेनिंग दिले जाईल.. यादरम्यान सिक्यूरिटी आणि सर्व्हिस स्कीलसंदर्भात सांगितले जाईल.

एअर इंडियाने १९०० पेक्षा अधिक केबिन क्रूला कामावर ठेवले होते. गेल्या सात महिन्यांत ११०० पेक्षा अधिक केबिन क्रूला प्रशिक्षण दिले होते. तर गेल्या तीन महिन्यात ५०० पेक्षा अधिक केबिन क्रूला ट्रेनिंग देऊन एअरलाईन्सद्वारे फ्लाइंगसाठी तयार केले होते.

एअर इंडियाने नुकतेच एअरबस आणि बोईंगकडून अंदाजे ४७० मोठे आणि मध्यम आकाराच्या विमानांच्या खरेदीची घोषणा केली आहे. यात अमेरिकाच्या बोईंगमधून २२० विमानांच्या आॅर्डर्सचाही समावेश आहे.

इंडिगोचीही विस्तारयोजना

एअर इंडियानंतर आता इंडिगोनेही एअरबस बोईंगला ५०० विमानांची आॅर्डर दिली आहे. वास्तविक इंडिगोने टर्किश एअऱलाईन्ससोबत एक नवा सामंजस्य करार केला आहे. विमानांची ही आॅडर्स त्याचाच एक भाग आहे. एअरलाइनच्या या हालचालीमुळे भारत ते इस्तंबूल आणि त्यापलीकडे प्रवासी सेवा सुधारण्याची अपेक्षा आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग