मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks to buy : कमाईची संधी! नायका, एलआयसी, हिंडाल्को व व्होडाफोनच्या शेअरवर ठेवा लक्ष

Stocks to buy : कमाईची संधी! नायका, एलआयसी, हिंडाल्को व व्होडाफोनच्या शेअरवर ठेवा लक्ष

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 25, 2023 09:47 AM IST

Stocks to buy : आज शेअर बाजारात व्यवसायात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांची चर्चा होत आहे. हिंडाल्को, नायकासह हे स्टाॅक्स अधिक चर्चेत आहेत.

stocks to buy HT
stocks to buy HT

Stocks to buy : जर तुम्हालाही आजच्या इंट्रा डेमध्ये शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला नफा कमवायचा असेल तर इंट्रा डेमध्ये या स्टाॅक्सवर लक्ष ठेवा. कारण या स्टाॅक्समध्ये गुंतवणूक करून तुम्ही भरपूर कमाई करू शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

हिंडाल्को

मेटल आणि खाणकाम क्षेत्रातील दिग्गज हिंदाल्कोने मार्च तिमाहीत स्टँड-अलोन निव्वळ नफ्यात ४८ टक्क्यांची घट नोंदवली आहे. मार्च तिमाहीत हिंदाल्को इंडस्ट्रीजचा निव्वळ नफा ८३२ कोटी रुपयांवर आला आहे. तथापि, ऑपरेशन्समधील कमाईच्या बाबतीत हिंदाल्को इंडस्ट्रीजमध्ये ५% वाढ झाली आहे आणि ती १९,९९५ कोटींवर पोहोचली आहे.

नायका

नायकाची मूळ कंपनी एफएसएन ईकाॅमर्स व्हेंचर्सने वर्षभराच्या आधारावर मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात ७२ टक्क्यांची घट नोंदवली आहे. मार्च तिमाहीत नायकाचा निव्वळ नफा २.४ कोटी रुपयांवर आला आहे. तथापि, नायकाचा एकत्रित महसूल ३३.७५ टक्क्यांनी वाढला आहे आणि मार्च तिमाहीत तो १३०१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

एलआयसी

विमा व्यवसायातील दिग्गज लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत १३४२८ कोटी रुपयांचा स्वतंत्र निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत, एलआयसीच्या स्वतंत्र निव्वळ नफ्यात ४६६% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीत एलआयसीचा स्वतंत्र निव्वळ नफा २३७१ कोटी रुपये होता.

महिंद्रा सीआय आॅटोमोटिव्ह

महिंद्रा अँड महिंद्राच्या प्रवर्तकांनी बुधवारी मोठ्या कराराद्वारे महिंद्रा सीआय ऑटोमोटिव्हमधील आपला संपूर्ण हिस्सा विकला आहे.

ऑइल इंडिया

तेल आणि वायू व्यवसायातील दिग्गज ऑइल इंडियाने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यात कंपनीचा निव्वळ नफा १७८८ कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ऑइल इंडियाच्या ऑपरेशन्समधून ५३९७ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

व्होडाफोन-आयडिया, सेल, पेज इंडस्ट्री, झी एन्टरटेन्मेंट

गुरुवारी, गुंतवणूकदार व्होडाफोन-आयडिया, सेल, पेज इंडस्ट्रीज आणि झी एंटरटेनमेंटच्या शेअर्सवर लक्ष ठेवतील कारण या कंपन्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग