मराठी बातम्या  /  business  /  PPF, EPF आणि FD वरही केली मात; 'या' सरकारी शेअरनं दिला तब्बल १७.५० टक्के लाभांश
dividend declared HT
dividend declared HT

PPF, EPF आणि FD वरही केली मात; 'या' सरकारी शेअरनं दिला तब्बल १७.५० टक्के लाभांश

21 February 2023, 19:52 ISTKulkarni Rutuja Sudeep

Coal India Dividend News : जर १७.५० टक्के डिव्हिडंट यील्डची तुलना पीपीएफ, ईपीएफ आणि बँक एफडी रिटर्न्सशी केल्यास या सरकारी कंपनीचा लाभांश हा गुंतवणूकीच्या इतर पर्यायांपेक्षा सरस आहे.

Coal India Dividend News : सरकारी कंपनी कोल इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांपासून सतत लाभांश देत आहेत. गेल्या वर्षात कोल इंडियाच्या शेअर्सनी आपल्या शेअर्स होल्डर्सना प्रती शेअर्स २८.२५ रुपयांचा डिव्हिडंट दिला आहे. याचाच अर्थ वार्षिक डिव्हिडंट यील्ड १७.५० टक्के होता. याचाच अर्थ वार्षिक लाभांश अंदाजे १७.५० टक्के होता. लाभांशाव्यतिरिक्त कोल इंडियाच्या शेअर्सचा परफाॅर्मन्सही चांगला आहे. या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात ३५ टक्के वाढ झाली आहे. तर एनएसई निफ्टीमध्ये गेल्या वर्षभरात अंदाजे ३.७० टक्के परतावा दिला आहे. तर बीएसई सेन्सेक्सने ५.२१ टक्के परतावा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कोल इंडियाच्या लाभांशाचा इतिहास

गेल्या वर्षभरात कोल इंडियाच्या शेअर्स २१ फेब्रुवारी २०२२ ला एक्स डिव्हिडंटवर होता. कंपनीने प्रती शेअर्स ५ रुपयांचा अंतरिम लाभांश दिला होता. ११ आॅगस्ट २०२२ ला कंपनीचे शेअर्स पुन्हा एक्स डिव्हिडंटवर होते. कंपनीने प्रती शेअऱ्स ३ रुपयांचा लाभांश दिला. कोल इंडियाचे शेअर्स १५ नोव्हेंबर २०२२ ला पुन्हा एक्स डिव्हिडंटवर होते. आणि कंपनीने प्रत्येक शेअर्सवर १५ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला. नुकतेच कंपनीने ८ फेब्रुवारी २०२३ ला एक्स डिव्हिडंट झाल्यानंतर प्रत्येक शेअर्सवर ५.२५ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.याप्रकारे कोल इंडियाने गेल्या वर्षभरात प्रत्येक शेअर्सवर गुंतवणूकदारांना २८.२५ रुपयांचा लाभांश दिला आहे.

कोल इंडियाचे डिव्हिडंट यील्ड

कोल इंडियाचे शेअर प्राईस गेल्या वर्षभरापूर्वी १६० रुपये होता. कंपनीने गेल्या वर्षी प्रती शेअर्स २८.२५ रुपयांचा लाभांश दिला आहे. याचाच अर्थ कंपनीने गेल्या वर्षभरात डिव्हिडंट यील्ट १७.५० टक्के होता.

डिव्हिडंट यील्डचा परतावा पीपीएफ, ईपीएस आणि बँक एफडीपेक्षाही जास्त

जर तुम्ही १७.५० टक्के डिव्हिडंट यील्डची तुलना पीपीएफ, ईपीएस बँक एफडीशी केल्यास कोल इंडियाच्या लाभांशाची टक्केवारी गुंतवणूकीसाठी अधिक चांगला पर्याय ठरु शकते. गेल्या वर्षभरात पीपीएफवरील व्याजदर ७.१० टक्के, ईपीएसवरील व्याजदर ८.१० टक्के, एफडीवरील व्याजदर ५ ते ६.५० टक्के आहे. याप्रमाणे कोल इंडिया या सरकारी कंपनीने गुंतवणूकदारांना दिलेला लाभांश कित्येक पटीने अधिक आहे. परताव्याच्या बाबतीत त्याने या सर्व सरकारी गुंतवणूकीच्या योजनांवर मात केली आहे.

विभाग